India Historic Defeat : भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस! नॉटिंघममध्ये टीम इंडियाचा टी-२० मध्ये लाजिरवाणा पराभव
India Historic Defeat : या लाजिरवाण्या पराभवासह भारतीय संघ ५ सामन्यांच्या मालिकेत २-० ने पिछाडीवर पडला असून, मालिका जिंकण्याची भारताची उरली सुरली आशाही संपुष्टात आली आहे.

IND vs ENG 3rd T20I Nottingham Shreyas Iyer Lowest Score Record : भारत आणि इंग्लंड यांच्यात नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या आणि मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडने भारताचा तब्बल १२५ धावांच्या रेकॉर्ड ब्रेक फरकाने धुव्वा उडवला. या लाजिरवाण्या पराभवासह भारतीय संघ ५ सामन्यांच्या मालिकेत २-० ने पिछाडीवर पडला असून, मालिका जिंकण्याची भारताची उरली सुरली आशाही संपुष्टात आली आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात भारताला पहिल्यांदाच १०० हून अधिक धावांनी पराभूत व्हावे लागले आहे. यजमान इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २०२ धावांचे आव्हान दिले होते, मात्र, प्रत्युत्तरात संपूर्ण भारतीय संघ अवघ्या ११.४ षटकांत ७६ धावांवर ढेपाळला. भाराताकडून सर्वाधिक धावा वैभव सूर्यवंशी आणि इशान किशनने प्रत्येकी १३-१३ धावा केल्या.
इतिहासात पहिल्यांदाच १००+ धावांनी पराभव; श्रेयसचा फ्लॉप शो –
श्रेयस अय्यरने कर्णधारपद सांभाळल्यापासून टीम इंडियाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. आयर्लंडविरुद्ध पहिल्यांदाच मालिका गमावल्यानंतर, इंग्लंड दौऱ्यावरही अय्यरच्या कप्तानीत भारताला सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागला आहे. यापूर्वी भारताचा धावांच्या दृष्टीने सर्वात मोठा पराभव २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध (८० धावा) झाला होता, पण आता १२५ धावांच्या या पराभवाने नवा नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
England win the 3rd T20I by 125 runs to lead the series 2-0.
Scorecard ▶️ https://t.co/jan4S8zsaV#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/JKung77cru
— BCCI (@BCCI) July 7, 2026
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे सर्वात मोठे पराभव:
- इंग्लंडविरुद्ध – १२५ धावा (नॉटिंघम, २०२६)
- न्यूझीलंडविरुद्ध – ८० धावा (वेलिंग्टन, २०१९)
- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध – ७६ धावा (अहमदाबाद, २०२६)
भारतीय संघाचा टी-२० इतिहासातील दुसरा नीचांकी स्कोअर –
या सामन्यात ७६ धावांवर बाद झालेली टीम इंडिया टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या दुसऱ्या सर्वात नीचांकी (Lowest) स्कोअरवर बाद झाली. भारताचा या फॉरमॅटमधील सर्वात कमी धावसंख्येचा रेकॉर्ड २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे ७४ धावांवर बाद होण्याचा आहे.
Absolute domination by England! 🔥
Put up 201 on the board and then bundled India out for just 76. A crushing 125-run victory and a complete one-sided performance in the 3rd T20. 🇬🇧🏏#ENGvIND #TeamIndia pic.twitter.com/prKxeSP4CV— A_B_D_17 (@MitulPa18821819) July 8, 2026
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे नीचांकी स्कोअर:
- ७४ धावा – ऑस्ट्रेलियाविरुद्ध (२००८, मेलबर्न)
- ७६ धावा – इंग्लंडविरुद्ध (२० Rot, नॉटिंघम)
- ७९ धावा – न्यूझीलंडविरुद्ध (२०१६, नागपूर)
हेही वाचा – Cricketer Pass Away : क्रिडाविश्वात शोककळा! ‘या’ माजी क्रिकेटपटूचे निधन
भारताचा मालिका जिंकण्याचा मनसुबा जरी संपला असला, तरी उर्वरित दोन सामने जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी अजूनही संघाकडे शिल्लक आहे.





