ENG vs SL 2nd Test : लॉर्ड्सवर शतक झळकावत रूटने रचला इतिहास, ॲलिस्टर कूकचा मोडला विक्रम…

ENG vs SL 2nd Test (Joe Root Century) : जो रूटने इतिहास रचला आहे. इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक शतके करणारा तो फलंदाज ठरला आहे. यासह रूटने ॲलिस्टर कुकचा विक्रम मोडला आहे. लंडनमधील लॉर्ड्सवर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात रूटने 103 धावा केल्या. या शतकी खेळीने त्याने कुकचा विक्रम मोडला.
इंग्लंडने पहिल्या डावात 427 धावा केल्या होत्या. तर श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 196 धावा करून सर्वबाद झाला होता. रूटने लॉर्ड्स कसोटीत दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या डावातही त्याने शतक झळकावले होते. रूटने 143 धावांची खेळी खेळली होती. त्याने 206 चेंडूंचा सामना करत 18 चौकार मारले. आता त्याने दुसऱ्या डावातही शतक झळकावले आहे. रुटने 121 चेंडूंचा सामना करत 103 धावा केल्या. या खेळीत रूटने 10 चौकार लगावले. त्याच्या या खेळीमुळे इंग्लंडने दुसऱ्या डावात सर्वबाद 251 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. या डावात हॅरी ब्रूकने 37 धावांचे योगदान दिले.
HISTORY AT LORD’S…!!!! 🫡
34th Test hundred for JOE ROOT – becomes the England batter to have most Test hundreds, overtaking Great Alastair Cook. 👌 pic.twitter.com/Frzg2rKvEK
— Johns. (@CricCrazyJohns) August 31, 2024
रूटने मोडला कूकचा विक्रम…
जो रूट इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 145 कसोटी सामन्यांमध्ये 34 शतके झळकावली आहेत. त्याने 65 अर्धशतकेही केली आहेत. रूटच्या आधी हा विक्रम ॲलिस्टर कुकच्या नावावर होता.
कुकने 161 कसोटी सामन्यांमध्ये 33 शतके झळकावली आहेत. त्याने 57 अर्धशतकेही केली आहेत. इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणाऱ्यांच्या बाबतीत केविन पीटरसन तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 23 शतके झळकावली आहेत. त्याने 104 सामन्यांमध्ये 35 अर्धशतकेही केली आहेत.





