Joe Root Century : जो रुटचा सिडनीत शतकी धमाका! पॉन्टिंगचा मोडला विक्रम; आता सचिनचाही ‘हा’ रेकॉर्ड धोक्यात?

Joe Root 41st Test Century : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या ‘ॲशेस’ (Ashes) कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना सिडनीत खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटने आपल्या कसोटी कारकीर्दीतील ४१ वे शतक झळकावले आहे. या शतकाच्या जोरावर त्याने ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पॉन्टिंगचा मोठा विक्रम मोडला आहे.
जो रुटने मोडला मोठा विक्रम –
जो रूटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ४१ वे शतक झळकावत रिकी पॉन्टिंगच्या ४१ शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. विशेष म्हणजे त्याने हा पराक्रम १६३ सामन्यांत करत पॉन्टिंगचा १६८ सामन्यांत ४१ शतके झळकावण्याचा विक्रम मोडला आहे. अशा प्रकारे पॉन्टिंगपेक्षा पाच कमी डावात जो रुटने हा विक्रम केला आहे. सामन्यांच्या संख्येचा विचार करता रूटने पॉन्टिंगला मागे टाकले आहे.
२०२६ सालातील पहिले आंतरराष्ट्रीय शतक
When modern greatness meets timeless legends. 🫱🏻🫲🏽🤍
Joe Root’s name belongs among the very best in Test cricket history. 💯#AUSvENG #Tests #JoeRoot #Sportskeeda pic.twitter.com/1tnv7b04He
— Sportskeeda (@Sportskeeda) January 5, 2026
२०२६ या कॅलेंडर वर्षातील हे पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठरले आहे. या शतकासह जो रूट आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
हेही वाचा – Bangladesh Refuse : बांगलादेश विश्वचषकातून बाहेर पडणार का? आयसीसीकडे कोणते आहेत तीन पर्याय? जाणून घ्या
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारे खेळाडू –
- सचिन तेंडुलकर: ५१ शतके (२०० सामने)
- जॅक कॅलिस: ४५ शतके (१६६ सामने)
- जो रूट: ४१* शतके (१६३ सामने)
- रिकी पाँटिंग: ४१ शतके (१६८ सामने)
- कुमार संगकारा: ३८ शतके (१३४ सामने)
इंग्लंडचा पहिला डाव ३८४ धावांवर मर्यादित –
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या संघाची सुरुवात खराब झाली होती. ५७ धावांवर त्यांचे ३ फलंदाज तंबूत परतले होते. मात्र, जो रूटने हॅरी ब्रूकच्या सोबतीने तिसऱ्या विकेटसाठी १६९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. हॅरी ब्रूकने ८४ धावांचे योगदान दिले.
हेही वाचा – Ishan Kishan Dropped : इशान किशनवर अन्याय? शतकी खेळीनंतरही संघात स्थान नाही; कोणाच्या सांगण्यावरून डावललं?
जो रूटने २४२ चेंडूंचा सामना करताना १५ चौकारांच्या मदतीने १६० धावांची संयमी खेळी केली. त्याला जेमी स्मिथ (४६ धावा) आणि विल जॅक्स (२७ धावा) यांनी चांगली साथ दिली. इंग्लंडचा पहिला डाव ३८४ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून मायकल नेसेरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर मिचेल स्टार्क आणि स्कॉट बोलंड यांनी प्रत्येकी १ विकेट्स मिळवली.





