Durand Cup 2024 : नॉर्थईस्ट युनायटेडनं पटकावलं विजेतेपद, अंतिम फेरीत गतविजेत्या मोहन बागानला केलं पराभूत…

Durand Cup 2024 (North East United vs Mohun Bagan) : नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने पेनल्टी शूटआऊटमध्ये गजविजेत्या मोहन बागानचा पराभव करून ड्युरंड कप 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. नॉर्थईस्ट युनायटेडने प्रथमच क्लब ट्रॉफी जिंकली आहे. नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असा विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले.
अंतिम सामना अतिशय रोमांचक झाला. नॉर्थइस्टसाठी अलादिन अझराई (56′) आणि गिलेर्मो (58′) यांनी शेवटच्या क्षणी लागोपाठ शानदार गोल केले आणि स्कोअर 2-2 असा बरोबरीत आणला.
FT | MBSG 2-2 NEUFC
Pen | MBSG 3-4 NEUFCAll square at the end of 9️⃣0️⃣ mins & the match went into penalties where Northeast United FC reigned supreme!
And NORTHEAST UNITED FC are the CHAMPIONS of the IndianOil Durand Cup! 🏆#Final #MBSGNEUFC #IndianOilDurandCup… pic.twitter.com/qXUczYZjGf
— Durand Cup (@thedurandcup) August 31, 2024
तत्पूर्वी, जेसन कमिंग्ज (11’P) आणि सहल अब्दुल समद (45+5′) यांनी पूर्वार्धात गोल करून मोहन बागानला 2-0 ने आघाडीवर नेले होते पण संघाला आघाडी कायम राखता आली नाही. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत राहिल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला आणि येथे नॉर्थईस्ट युनायटेडने बाजी मारली.
Paris Paralympics 2024 : नेमबाज रुबिनाची कांस्यपदकाला गवसणी, भारताची पदकसंख्या पोहचली 5 वर ….
दोन्ही संघ वेगवेगळ्या शैलीत अंतिम फेरीत पोहोचले होते. नॉर्थईस्ट युनायटेडने आपले सर्व सामने चमकदारपणे जिंकले. त्याने 16 गोल केले होते आणि त्याला फक्त एक गोल स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी स्टार खेळाडूंनी सजलेला मोहन बागानचा संघ दोन पेनल्टी शूटआऊटनंतर अंतिम फेरीत पोहोचला होता.





