Elon Musk ट्विटर म्हणजेच X ला सुपर अॅप बनवण्यासाठी सतत नवनवीन फीचर्स आणत आहे. हा ट्रेंड पुढे नेत मस्क आता पुढील वर्षी X मध्ये मोठे बदल करणार आहेत. बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, X पुढील वर्षापासून डेटिंग अॅप म्हणूनही काम करेल.
अहवालात म्हटले आहे की, कंपनीच्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी एका व्हिडिओ कॉल दरम्यान या गोष्टी सांगितल्या आहेत. येत्या काही वर्षांत X कसा असेल याबद्दल मस्क खूप उत्सुक आहेत. एका अहवालात असेही म्हटले आहे की, X लवकरच डिजिटल बँक म्हणून काम करेल आणि ते बँक खात्याची गरज देखील संपवतील.
पहिल्या मीटिंमध्ये सांगितले होते –
द व्हर्जच्या रिपोर्टनुसार, मस्क बँक खात्याची गरज संपवण्याच्या तयारीत आहेत. द व्हर्जने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बातमी दिली की मस्कला X ही बँक बनवायची आहे. असे सांगितले जात आहे की, ट्विटर विकत घेतल्यानंतर मस्क यांनी कर्मचार्यांशी पहिल्या बैठकीत X ला डिजिटल बँक बनवण्याची कल्पना सांगितली होती. यामध्ये मस्क यांनी म्हटले होते की, डिजिटल बँकेची त्यांची कल्पना उच्च नफा देणारे मनी मार्केट खाती, डेबिट कार्ड, चेक आणि कर्जाशी संबंधित आहे.