पाचगणी – तंबाखू घेण्याची सवय जीवघेणी ठरल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. उंदीर मारण्यासाठीचे औषध मारल्यानंतर त्याच हाताने तंबाखू खाल्ल्याने तरुणाला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
उमेश धोंडिबा ढेबे (वय 26, रा. शिंदी, ता. महाबळेश्वर) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 3 जुलै रोजी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
1 जुलै रोजी दुपारच्या सुमारास उमेश धोंडीबा ढेबे यांनी उंदीर मारण्यासाठी औषध टाकले व त्याच हाताने तंबाखू खाल्ली. त्यानंतर पहाटे तीन वाजता त्याच्या पोटात दुखू लागले. सुरुवातीला त्यांना प्रथमोपचारासाठी कंळबणी ग्रामीण रूग्णालय नेण्यात आले. तेथून अधिक उपचाराकरीता रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.अशी माहिती महाबळेश्वर पोलिस ठाण्याकडून देण्यात आली.
मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या मृत्यूच्या अधिक चौकशीसाठी रत्नागिरी पोलीस ठाण्यातून दि. 3 जुलै रोजी अन्वये दाखल होऊन टपालाने सोमवारी दि.17 रोजी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात आले. हा प्रकार महाबळेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील असल्याने महाबळेश्वर पोलीस ठाणेस फिर्यादी गणेश धोंडीबा ढेबे (रा. शिंदी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास महाबळेश्वर पोलिस करत आहेत.