Pune accident news : मद्यधुंद चालकाचा प्रताप! थेट डीसीपींच्या कारलाच ठोकलं; पुण्यातील घटना

Pune accident news : पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून मंद्यधुंद अवस्थेत कार चालवत अपघातच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच आता पुण्यातील केशवनगर परिसरात स्वातंत्रदिनाच्या दिवशी रात्री एका मंद्यधुंद चालकाने चक्क डीसीपींच्या कारलाच जोरदार धडक दिली आहे.
ही अपघाताची घटना शुक्रवारी दि. १५ रोजी रात्री दहा ते साडे दहा वाजण्याच्या केशवनगर भागात घडली आहे. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वाहतूक डिसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीला धडक दिली असून, या अपघातात ते किरकोळ जखमी झाले आहेत, तर त्यांची मुलगीही किरकोळ जखमी झाली असल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर मुंढवा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून मद्यधुंद चालकांविरोधात ड्रँक अँड ड्राईव्ह अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :लाल किल्ल्यावर राहुल गांधी आणि खर्गे अनुउपस्थित, काँग्रेसने दिले स्पष्टीकरण, म्हणाले ‘परंपरा मोडली’



