लाल किल्ल्यावर राहुल गांधी आणि खर्गे अनुउपस्थित, काँग्रेसने दिले स्पष्टीकरण, म्हणाले ‘परंपरा मोडली’

Rahul Gandhi and Mallikarjun Kharge | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79व्या स्वातंत्र्य दिनी सलग 12व्यांदा तिरंगा फडकावला. इंदिरा गांधी यांना मागे टाकत सर्वाधिक वेळा तिरंगा फडकावणारे मोदी दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. तसेच आतापर्यंतच्या त्यांच्या लाल किल्ल्यावरील भाषणापैकी सर्वात मोठं 103 मिनिटं भाषण मोदींनी यावेळी केलं.
शुक्रवारी लाल किल्ल्यावर आयोजित समारंभात जिथे पंतप्रधान मोदी यांनी हा खास विक्रम नोंदवला. तिथे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वातावरण तापले.
स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात ‘ही’ परंपरा मोडली
यावर काँग्रेसकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अजय उपाध्याय यांनी एका वृत्तवाहिनीवर आयोजित कार्यक्रमात सांगितले की, “गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना शेवटच्या रांगेत बसवण्यात आले होते. पण पूर्वी विरोधी पक्षनेते नेहमीच पहिल्या रांगेत बसत असत. गेल्या 78 वर्षांत पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याला मागच्या रांगेत बसवण्यात आले होते.” Rahul Gandhi and Mallikarjun Kharge |
पुढे उपाध्याय म्हणाले की, “लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्याला पंतप्रधान मोदींसोबत पुढच्या रांगेत बसवण्याची संसदीय परंपरा कायम आहे. मात्र, गेल्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात ही परंपरा मोडली गेली. हा केवळ राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेते म्हणून असलेला प्रश्न नाही. हा एका संवैधानिक पदाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे.”
“संविधानाच्या प्रतिष्ठेचा भंग होऊ नये म्हणून राहुल गांधी आणि खर्गे यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि राष्ट्रध्वजही फडकावला आहे. अशा परिस्थितीत या मुद्द्यावर राजकारण होऊ नये,” असे आवाहन देखील त्यांनी केले.
शहजाद पूनावाला यांचा हल्लाबोल
लाल किल्ल्यावर आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात विरोधी पक्षनेत्याच्या अनुपस्थितीवर भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, ‘विरोधी पक्षनेतेपद हे एक संवैधानिक पद आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहणे हे त्यांचे संवैधानिक कर्तव्य आहे.’ दरम्यान, खर्गे आणि राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहिली आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र लाल किल्ल्यावर उपस्थित राहणे टाळले. Rahul Gandhi and Mallikarjun Kharge |
हेही वाचा :





