Pune News : श्री कुंडेश्वर अपघातातील आणखी एका महिला भाविकाचा उपचारादरम्यान मृत्यू

राजगुरुनगर : काही दिवसांपूर्वी पापळवाडी ,पाईट ता खेड येथील श्री कुंडेश्वरच्या दर्शनाला जाणाऱ्या महिला भाविकांच्या वाहनाला अपघात झाला होता. यामध्ये अजून एका महिला भाविकाचा आज (दि.१५) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतांची संख्या आता १२ झाली आहे. लक्ष्मीबाई हरिश्चंद्र कोळेकर (वय ४९) असे आज उपचार घेत असताना मृत्यू झालेल्या महिला भाविकाचे नाव आहे.
११ ऑगस्ट रोजी श्री कुंडेश्वरच्या दर्शनाला जाणाऱ्या महिला भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला होता. या अपघातात अपघाताच्या दिवशी उपचार सुरू असताना १० महिलांचा मृत्यू झाला होता. तर ३० जण जखमी झाले होते. यातील काही महिला अत्यवस्थ होत्या.जखमींवर विविध हॉस्पीटल मध्ये उपचार सुरू आहेत.
काल गुरुवारी दि.११ रोजी सुलाबाई बाळू चोरघे यांचा उपचारादरम्यान आदित्य बिर्ला रुग्णालय पुणे येथे मृत्यू झाला होता.आज शुक्रवारी (दि.१५) रोजी साईनाथ हॉस्पिटल – मोशी येथे लक्ष्मीबाई हरिश्चंद्र कोळेकर यांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. या भीषण अपघातात आतापर्यंत १२ महिलांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील मृतांची संख्या वाढत असल्याने पापळवाडी (पाईट) गाव आणि परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघातातील अनेक जण मृत्यूचा सामना करीत आहेत.





