पुणे – देशभरातील चालक मालकांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करणे, वेल्फेअर बोर्डाची स्थापना करणे चालक (ड्रायव्हर) दिवस घोषित करा, हिट अँड रन कायदा मागे घ्यावा या मागण्यांसह इतर अनेक मागण्यांसाठी चालक-मालक दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करणार आहेत, अशी माहिती आॅटो, टॅक्सी, टेम्पो, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली. येत्या २६ फेब्रुवारी रोजी या आंदोलनाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माॅंसाहेब कॅब संघटनेच्या अध्यक्ष वर्षा शिंदे, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, शिवनेरी रिक्षा संघटनेचे अशोक साळेकर, मनसे वाहतूक विभागाचे अध्यक्ष किशोर चिंतामणी, आम आदमी पक्षाचे संघटक एकनाथ ढोले, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर अध्यक्ष महंमद भाई शेख, विलास केमसे-पाटील आणि अन्सारी उपस्थित होते.
कांबळे म्हणाले, चालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर जागृती करण्यासाठी नुकतेच देशव्यापी ड्रायव्हर जोडो अभियान राबवण्यात आले. पंजाब, ओडिसा, कर्नाटक, तेलगणा, आंध्र प्रदेश या राज्यांसह इतर अनेक राज्यांमध्ये चालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दिल्ली येथील जंतर-मंतरवर जोरदार आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने चालक मालकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करावी, मार्ग काढावा, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल