Bigg Boss Marathi 6 : आता राडा होणारच..! ड्रामा क्वीन राखी सावंतची ‘बिग बॉस’च्या घरात होणार एन्ट्री; सदस्यांना पळो की सळो करणार
आता घरातील वातावरण पुन्हा एकदा फिरणार आहे. कारण राखी सावंत म्हंटलं की, राडा होणारच आणि मनोरंजनाचा तडका देखील लागणार आहे.

Rakhi Sawant in Bigg Boss Marathi 6 – ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचा चौथा आठवडा सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. पहिल्याच दिवसापासून या पर्वात अनेक अनपेक्षित ट्विस्ट पाहायला मिळाले असून, स्पर्धकांची निवड आणि टास्क्समुळे घरातील वातावरण सतत बदलत आहे. मात्र आता या पर्वात आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धमाका होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवणारी अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेणार असल्याचं कळत आहे. त्यामुळे आता घरातील वातावरण पुन्हा एकदा फिरणार आहे. कारण राखी सावंत म्हंटलं की, राडा होणारच आणि मनोरंजनाचा तडका देखील लागणार आहे.
कशी असेल राखीची एन्ट्री !
राजश्री मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, राखी सावंत या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात दाखल होणार आहे. मात्र ही एन्ट्री वाइल्ड कार्ड म्हणून नसून, राखी फक्त १५ दिवसांसाठी म्हणजेच दोन आठवड्यांसाठी पाहुणी कलाकार म्हणून घरात राहणार आहे.
ही बातमी वाचा : Bigg Boss Marathi 6 : टोळी फुटली.! ‘बिग बॉस’च्या घरातून राधा पाटील बाहेर
राखी सावंतचा स्वभाव, तिची स्पष्ट वक्तव्ये आणि नाट्यमय वागणूक पाहता, ती घरातील सदस्यांना पळो की सळो करून सोडणार, यात शंका नाही. तिच्या उपस्थितीमुळे घरातील समीकरणे बदलणार असून, वाद, मनोरंजन आणि ड्रामाचा तडका निश्चितच वाढणार आहे.
याआधीही ‘बिग बॉस मराठी’त राखीची जोरदार उपस्थिती :
राखी सावंत याआधीही ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या आणि पाचव्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. ‘बिग बॉस मराठी ४’ मध्ये राखीने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेत घरात धुमाकूळ घातला होता. तर पाचव्या सीझनमध्ये ती पाहुणी कलाकार म्हणून आली होती.
एंटरटेनमेंटचा हमखास डोस.!
राखी सावंत म्हणजे, वादग्रस्त वक्तव्ये, खट्याळ टोमणे, भावनिक ड्रामा आणि प्रेक्षकांसाठी भरपूर मनोरंजन म्हणूनच तिची एन्ट्री म्हणजे TRP वाढवणारा मास्टरस्ट्रोक मानला जातो. आता ‘बिग बॉस मराठी ६’मध्ये तिच्या आगमनामुळे खेळ आणखी रंगणार यात शंका नाही.
हे देखील वाचा :
Bird Flu : देशात पुन्हा बर्ड फ्लूची एन्ट्री; केंद्र सरकारकडून सतर्कतेचा इशारा





