Finally! बिग बॉस मराठी फेम शिव ठाकरेने गुपचूप उरकलं लग्न

Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठी फेम लोकप्रिय अभिनेता आणि मॉडेल शिव ठाकरेने गुपचूप लग्न उरकलं. त्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत सर्वांना ही आनंदाची बातमी दिली आहे. शिवने मुंडावळ्या घातलेला खास फोटो शेअर केल्याने त्याने लग्नाची गुड न्यूज दिल्याची चर्चा आहे. शिवसोबत त्याची बायकोही दिसत आहे.
शिव ठाकरेने पोस्ट केलेला हा फोटो तुफान व्हायरल झाला असून चाहते त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.फोटोमध्ये शिव ठाकरे मुंडावळ्या बांधून दिसत आहे. तर त्याची पत्नी पाठमोरी आहे. तिने सोनेरी रंगाची साडी नेसली असून मुंडावळ्या बांधल्या आहेत. ‘Finally’ हा एकच शब्द शिवने फोटोच्या कॅप्शनमध्ये दिला आहे.
View this post on Instagram
शिवने बायकोचा चेहरा सर्वांना दाखवला नाही. मात्र दुसरीकडे, शिवने लग्न केलं नसून हा फोटो त्याच्या आगामी प्रोजेक्ट संदर्भात असल्याचंही बोललं जातंय. आता याविषयी खरं काय हे शिव लवकरच स्पष्ट करेल, अशी सर्वांना आशा आहे.
शिव ठाकरेचं याआधी अभिनेत्री वीणा जगतापसोबत नाव जोडलं होतं. दोघांनी त्यांच्या नात्याची कबुलीही दिली होती. परंतु काही दिवसांनंतर दोघांचे ब्रेकअप झाले. दरम्यान, शिव ठाकरे ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरला होता. त्यानंतर तो बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वाचा उपविजेताही झाला. मराठीसह हिंदी शोमध्येही त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली.
हेही वाचा:
व्हेनेझुएला, इराणनंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘या’ देशाला इशारा ; म्हणाले,”करार करा नाही तर…”





