Deepika Singh : ‘दिया और बाती हम’ या मालिकेतून घराघरात पोहचणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका सिंह(Deepika Singh). संध्या बिननी या भूमिकेतून तिने प्रेक्षकांची मन जिंकली होती. या मालिकेनंतर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले. अनेक व्हिडिओ आणि फोटो ती शेअर करताना दिसते. मात्र अनेकदा तिला मोठ्या ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो.
दीपिका सिंह सोशल मीडियावर अधिक करून तिचे डान्सचे व्हिडिओ शेअर करते. मात्र तिच्या या डान्सला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. अनेकजण तिच्या या व्हिडिओवर नाराजी व्यक्त करताना दिसतात. या व्हिडीओमुळे दीपिका सिंह ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील दिसते. आता नुकताच याबद्दल दीपिका सिंह हिने खुलासा केला आहे.
एका मुलाखती दरम्यान दीपिका सिंह म्हणाली की, “मी गेल्या काही दिवसांपासून माझ्या परीक्षेमध्ये व्यस्त होते. मात्र, आता मी परत एकदा सोशल मीडियावर परत आली आहे. मुळात म्हणजे मी जेंव्हा क्लासिकल डान्सचे व्हिडीओ शेअर करते, त्यावेळी लोक वाईट कमेंट करत नाहीत. मी ज्यावेळी काहीतरी वेगळी डान्सचे व्हिडीओ किंवा गाण्याचे व्हिडीओ शेअर केले की, मला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. मुळात म्हणजे या ट्रोलिंगचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही.”
पुढे ती म्हणाली, “लोक मी इतर व्हिडीओ शेअर केल्यावर म्हणतात की, नाचण्याशिवाय तुला दुसरे काही काम नाही का? मला डान्स करण्यास आणि ते व्हिडीओ अपलोड करण्यास आवडते. बाकी गोष्टींचा माझ्यावर काही परिणाम होत नाही. मी काही दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर होते. पण पुन्हा परत एकदा मी तुम्हाला सोशल मीडियावर दिसेल.” असे म्हणत तिने ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे.