Crime News : महाराष्ट्र हादरला..! प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोन तरुणांना बेदम मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
Crime News : प्रेमप्रकरणाच्या संशयातून तुळजापूर शहरात दोन तरुणांना विवस्त्र करून, अंग काळं-निळं होईपर्यंत बेदम मारहाण केल्याची अत्यंत अमानुष व धक्कादायक घटना समोर आली आहे.

Crime News : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोन तरुणांना अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत समीर जब्बार पटेल याचा मृत्यू झाला, तर अरबाज अफसर सय्यद हा गंभीर जखमी झाला आहे. (Crime News)
त्याच्यावर धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, तुळजापूर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Crime News)
चहा पित असताना अरबाजला कारमध्ये बसवले
मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज सय्यद हा तुळजापूर शहरात चहा पीत बसला होता. त्यावेळी तिघांनी त्याला कथितरीत्या जबरदस्तीने कारमध्ये बसवून शिंदे महाराज यांच्या शेतात नेले. तेथे त्याच्या तोंडावर आणि पाठीवर बेदम मारहाण करण्यात आली. (Crime News)
यानंतर त्याच्याकडून मोबाईलचा पासवर्ड घेऊन फोन तपासण्यात आला. मोबाईलमध्ये आक्षेपार्ह काहीही आढळले नसतानाही पुन्हा मारहाण करण्यात आल्याचा दावा जखमी अरबाजने केला आहे. (Crime News)
खिशातील 10 हजार रुपये काढून घेतल्याचा आरोप
अरबाजच्या खिशातील 10 हजार रुपये काढून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ‘तू आमच्याच भागात कमावतोस आणि आमच्या मुलींना त्रास देतोस,’ असे म्हणत त्याला तब्बल दोन तास मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. (Crime News)
समीरला बोलावून टोळक्याकडून मारहाण
यानंतर समीर जब्बार पटेल याला घटनास्थळी बोलावण्यात आले. तेथे 15 ते 20 जणांच्या टोळक्याने त्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत समीरचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Crime News)
दरम्यान, अरबाजलाही मृत समजून तुळजापूर शहरातील पार्किंग परिसरात आणून सोडण्यात आले. मात्र, तो गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Crime News)
सहा जणांविरोधात गुन्हा; पोलिसांचा तपास सुरू
या प्रकरणी तुळजापूर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. मारहाणीमागील नेमके कारण, सहभागी व्यक्तींची भूमिका आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तपासातून स्पष्ट होणार आहे. (Crime News)
Crime News : बनावट आरटीओ चलन लिंकद्वारे दोघांना ११ लाखांचा गंडा





