Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धक्का; ‘या’ माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश
Maharashtra Politics : मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाला मोठा राजकीय सुरुंग लागला आहे.

Maharashtra Politics : ठाकरेसेनेचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे बुधवारी ठाण्यात सत्ताधारी शिवसेनेत सामील झाले. यावेळी पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. टारफे यांच्यासोबत हिंगोलीतील ठाकरेसेनेचे काही पदाधिकारी आणि स्थानिक नेतेही शिवसेनेत सामील झाले आहेत. (Maharashtra Politics)
हिंगोली जिल्ह्यातील माजी आमदार असलेल्या टारफे यांचे पक्षात स्वागत करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वामुळे आदिवासी समाजासाठी सुरू असलेली विकासकामे अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यास मदत होईल. (Maharashtra Politics)
समाजासाठी आणि पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन करत, शिंदे यांनी आश्वासन दिले की, या भागातील प्रलंबित विकासकामे, आवश्यक पायाभूत सुविधा आणि आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणासाठी सरकार सर्वतोपरी सहकार्य करत राहील. (Maharashtra Politics)
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; भूमीपूजन केलेला २५ कोटींचा प्रकल्प भाजपकडून रद्द





