Virat Kohli Record : सचिन तेंडुलकरचा ‘विराट’ विश्वविक्रम अखेर मोडला! नवा इतिहास रचत कोहली बनला जगातील नंबर १ चेस मास्टर
Virat Kohli Record : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजीने शानदार कामगिरी केली. त्याने ७४ धावांची धडाकेबाज खेळी करत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

Virat Kohli Breaks Sachin Tendulkar Most Runs Record In ODI Run Chases : भारतीय क्रिकेटचा ‘चेस मास्टर’ विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा नवा इतिहास रचला आहे. न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंड येथे पार पडलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराटने क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा आणखी एक विश्वविक्रम मोडला आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना ७४ धावांची मॅचविनिंग खेळी साकारत विराटने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्याचा बहुमान पटकावला.
सचिनला टाकले मागे; कमी डावांत उभारला धावांचा डोंगर
न्यूझीलंडविरुद्धच्या ७४ धावांच्या खेळीदरम्यान विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना आपल्या धावांची संख्या थेट ८७४१ वर नेली. यापूर्वी हा जागतिक विक्रम सचिन तेंडुलकरच्या (८७२० धावा) नावावर होता. सचिनने २४२ सामन्यांतील २३२ डावांत हा टप्पा गाठला होता; तर विराटने अवघ्या १८० सामन्यांतील १६९ डावांत सचिनला मागे टाकले. सरासरीच्या बाबतीतही ६६.२१ ची सरासरी आणि ९५.०३ चा स्ट्राईक रेट राखणारा विराट, सचिनच्या (सरासरी ४२.३३, स्ट्राईक रेट ८८.४४) खूप पुढे आहे. विराटने चेस करताना ३० शतके आणि ४६ अर्धशतके झळकावली आहेत.
विदेशी भूमीवर ‘अर्धशतकांची फिफ्टी’; कोहलीचा नवा पराक्रम
KING KOHLI BREAKS SACHIN TENDULKAR’S RECORD! 🇮🇳💙
Virat Kohli surpasses the Master Blaster to become the highest run-scorer in ODI run chases! 👌
#NZvIND #ODIs #Sportskeeda https://t.co/qK87hXBdJc
— Sportskeeda (@Sportskeeda) November 4, 2026
या सामन्यात विराटने आणखी एक अद्वितीय टप्पा पार केला. विदेशी भूमीवर खेळताना त्याने ५० व्यांदा ५० किंवा त्याहून अधिक धावांची खेळी साकारत ‘अर्धशतकांचे अर्धशतक’ पूर्ण केले. परदेशातील आपल्या १२८ व्या एकदिवसीय सामन्यात विराटने २१ शतके आणि २९ अर्धशतकांसह हा पल्ला गाठला. तसेच या सामन्यात त्याने कारकिर्दीतील ८० वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय अर्धशतकही पूर्ण केले.
गिल-विराटची ११३ धावांची भागीदारी; भारताची १-० ने आघाडी
Virat Kohli equals Ricky Ponting’s record for the most 50+ scores in ODI victories.
#ViratKohli #INDvsNZ #ODI #RickyPonting https://t.co/0NzLafOYND
— CricTracker (@Cricketracker) November 4, 2026
पावसामुळे व्यत्यय आलेल्या या लढतीत भारताला डकवर्थ-लुईस (DLS) नियमानुसार ३२ षटकांत १४३ धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले होते. सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर कर्णधार शुबमन गिल (३७ धावा) आणि विराटने दुसऱ्या गड्यासाठी ११३ धावांची भागीदारी रचून विजयाचा पाया रचला. अखेर भारताने २२.४ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्य गाठत दणदणीत विजय मिळवत. यासह पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.





