Devon Conway : डेव्हॉन कॉनवेचा दोन वर्षानंतर शतकी धमाका! झिम्बाब्वेत केले दोन खास पराक्रम

Devon Conway 5th Test Century : न्यूझीलंडचा स्टार सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने शुक्रवारी झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार खेळी करत दोन खास पल्ले गाठले. त्याने 245 चेंडूत 18 चौकारांसह 153 धावांची खणखणीत खेळी केली. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 2,000 धावा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5,000 धावांचा टप्पा गाठला.
डेव्हॉन कॉनवेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5,000 धावा पूर्ण –
कॉनवेचे हे सुमारे दोन वर्षांनंतरचे पहिले कसोटी शतक आहे. यापूर्वी त्याने जानेवारी 2023 मध्ये पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले होते. कॉनवेने 29 कसोटी सामन्यांत 39.26 च्या सरासरीने 2,081 धावा केल्या असून, त्यात पाच शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 200 आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर 119 सामन्यांत त्याने 40.43 च्या सरासरीने 5,054 धावा केल्या, ज्यात 10 शतके आणि 27 अर्धशतके आहेत.
न्यूझीलंडसाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज केन विल्यमसन –
5️⃣th Test hundred for Devon Conway 💯#Cricket #ZIMvsNZ #devonconway pic.twitter.com/TV9ft3hCvF
— CricketTimes.com (@CricketTimesHQ) August 8, 2025
न्यूझीलंडसाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून केन विल्यमसन अव्वल आहे. त्याने 105 सामन्यांत 186 डावांत 54.88 च्या सरासरीने 9,276 धावा केल्या, ज्यात 33 शतके आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 251 आहे. न्यूझीलंडने डेव्हॉन कॉनवे , हेन्री निकोल्स आणि रचिन रविंद्र यांच्या शतकांच्या जोरावर पहिल्या डावात 500 हून अधिक धावा केल्या. दुसरीकडे, झिम्बाब्वेचा पहिला डाव अवघ्या 125 धावांत आटोपला.
हेही वाचा – R Ashwin : IPL 2026 आधी मोठी खळबळ! सॅमसन पाठोपाठ अश्विनही सीएसकेची साथ सोडणार?
टॉम लॅथमच्या डाव्या खांद्याला दुखापत –
न्यूझीलंडचा नियमित कर्णधार टॉम लॅथम डाव्या खांद्याच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत मिशेल सँटनर संघाचे नेतृत्व करेल. पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने नऊ गडी राखून दमदार विजय मिळवला असून, ते सध्या दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहेत.





