Devendra Fadnavis : सोलापूरला मिळणार आयटी आणि गारमेंट पार्क! जिल्ह्याला वाढवण बंदराशी जोडणार; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या विकासासाठी अनेक घोषणा केल्या आहेत.

Devendra Fadnavis : सोलापूरला वाढवण बंदराशी जोडण्याचे काम आम्ही करणार आहोत. तसेच लवकरच येथे आयटी पार्कही सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. (Devendra Fadnavis)
त्यांनी बार्शी येथील श्री भगवंत प्रकट दिनाच्या निमित्ताने महापूजा केली. त्यानंतर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार व कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या विकासासंदर्भात भाषण केले. (Devendra Fadnavis)
फडणवीस म्हणाले, पंढरपूरला देशभरातून भाविक दर्शनसाठी येत असतात. त्यामुळे केवळ पंढरपूर नाही तर जिल्ह्याचे रुप बदलेल असा विकास करणार आहोत. पंढरपूरला कॉरीडॉर करत आहोत. अनेकजण शंका घेत आणि लोकांना घाबरवण्याचे कामे करत आहेत. (Devendra Fadnavis)
पण, मुबलक मोबदला देतोय. आज जो धंदा पंढरपूरमध्ये दुकानदारांचा होतोय, कॉरीडॉर झाला तर तो धंदा दहापट वाढेल अन्यथा माझे नाव तुम्हीच बदला. उजनी धरणाच्या पाण्याचे बाष्पीभवन थांबवण्यासाठी देखील काम करत आहोत. (Devendra Fadnavis)

Devendra Fadnavis : सोलापूरला मिळणार आयटी आणि गारमेंट पार्क! जिल्ह्याला वाढवण बंदराशी जोडणार; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
तसेच, महात्मा बसवेश्वर यांनी लोकशाही समजून दिली, त्यांच्या स्मारकासाठी लागेल तो निधी उपलब्ध करून देऊ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे शिल्पकार येथील जनता आहे, त्यांनतर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि त्यानंतर आमदारांची फौज आहे. (Devendra Fadnavis)
या सगळ्यांनी मिळून हा विजय खेचून आणला आहे. हा विजय विकासाचा विजय, विकासाच्या मुद्यावर ज्यांचा विश्वास त्यांचा विजय आहे. तसेच, सोलापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, पण आमचा प्रयत्न आहे याच वर्षात ते महाविद्यालय सुरु व्हावे. (Devendra Fadnavis)
आयटी पार्क घोषणा करून थांबलो नाही. फेब्रुवारीमध्ये आम्ही त्यासाठी जमीन देखील दिली. आता, लवकरच हे आयटी पार्क सुरु करून शिकलेल्या लोकांना इथंच कामे द्यायचा प्रयत्न आहे. सोलापुरात आधुनिक रेडिमेड गारमेंट पार्क तयार करू, असेही फडणवीस यांनी म्हटले. (Devendra Fadnavis)





