\nरोहिणी खडसेंनी शेअर केला नार्वेकरांचा व्हिडिओ 
\nरोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून नार्वेकर यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी लिहिले की, “मनसे पक्षप्रमुख श्री. राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट वाचली आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांचे कालचे आशा दिदींच्या शोक प्रस्तावाचे भाषण ऐकले.

\n

‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ असं का म्हटलं जातं यांचं जळजळीत वास्तवच अक्षरशः समोर आलं. विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे हेडमास्तर, पण नार्वेकरांचे भाषण ऐकून हेडमास्तरांना पुन्हा शाळेत घालण्याची वेळ आलीये, असं म्हटलं तर ते चुकीचे ठरणार नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

\n

राज ठाकरेंकडून संताप व्यक्त

\n

“पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी?

\n

नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही.

\n
\n

पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली…

\n

— Raj Thackeray (@RajThackeray) June 23, 2026

\n


\nबरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही.

\n

नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत. भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे,” अशी जहरी टीका राज ठाकरे यांनी नार्वेकरांवर केली आहे. Rohini Khadse

\n

फडणवीसांवर हल्लाबोल 

\n

“सभागृहात देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी (स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं !

\n

पण त्यांच म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर , अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना ? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो. शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला,” असेही राज ठाकरे यांनी म्हंटले.

\n

मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला 

\n

“नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत,” असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी नार्वेकरांवर साधला.

\n

हेही वाचा: 

\n

Satara: एकल महिलांच्या उन्नतीसाठी जिल्हा परिषद कटिबद्ध, डॉ. सौ. प्रिया शिंदे; एकल महिला दिनानिमित्त कार्यशाळा

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Rohini Khadse : “हेडमास्तरांना पुन्हा शाळेत घालण्याची वेळ आली”; नार्वेकरांना मराठीही वाचता न आल्याने रोहिणी खडसेंची टीका","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/06/Rohini-Khadse-2.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Pradnyapawar","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/after-hearing-narvekars-speech-it-seems-the-time-has-come-to-send-the-headmaster-back-to-school-rohini-khadses-criticism#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/06/Rohini-Khadse-2.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/after-hearing-narvekars-speech-it-seems-the-time-has-come-to-send-the-headmaster-back-to-school-rohini-khadses-criticism#webpage","name":"Rohini Khadse : “हेडमास्तरांना पुन्हा शाळेत घालण्याची वेळ आली”; नार्वेकरांना मराठीही वाचता न आल्याने रोहिणी खडसेंची टीका","url":"https://www.dainikprabhat.com/after-hearing-narvekars-speech-it-seems-the-time-has-come-to-send-the-headmaster-back-to-school-rohini-khadses-criticism","inLanguage":"mr","description":"Rohini Khadse : राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणविसांवरही हल्लाबोल ","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/after-hearing-narvekars-speech-it-seems-the-time-has-come-to-send-the-headmaster-back-to-school-rohini-khadses-criticism#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/06/Rohini-Khadse-2.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/after-hearing-narvekars-speech-it-seems-the-time-has-come-to-send-the-headmaster-back-to-school-rohini-khadses-criticism#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/after-hearing-narvekars-speech-it-seems-the-time-has-come-to-send-the-headmaster-back-to-school-rohini-khadses-criticism","name":"Rohini Khadse : “हेडमास्तरांना पुन्हा शाळेत घालण्याची वेळ आली”; नार्वेकरांना मराठीही वाचता न आल्याने रोहिणी खडसेंची टीका"}}]}}}

Rohini Khadse : “हेडमास्तरांना पुन्हा शाळेत घालण्याची वेळ आली”; नार्वेकरांना मराठीही वाचता न आल्याने रोहिणी खडसेंची टीका