Devendra Fadnavis : पुणे जिल्ह्यातील भोरमधील नसरापूर मधील चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृणपणे संपवलं, या घटनेनंतर पुणे जिल्ह्यासह राज्यात संतापाची लाट पसरली आहे. ६५ वर्षीय नराधम आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी राज्यभरातून करण्यात आली. (Devendra Fadnavis) यासाठी अनेक ठिकाणी नागरिकांकडून आंदोलनही करण्यात आलेहे. ‘आरोपीला आमच्या ताब्यात द्या’, असं म्हणत पुणे शहरात नवले ब्रिज परिसरात सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प करण्यात आला होता. (Devendra Fadnavis) एकीकडे राज्यभरात नसरापूर प्रकरणामुळे संतापाची लाट असताना, दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपला विजय मिळाला म्हणून आनंद साजरा केला. इतकेच काय तर झालमुरीचा आस्वाद घेतला. यावरून मनसेच्या महिला नेत्या शालिनी ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. Top 10 News : लाडक्या बहिणींच्या खात्यात ४५०० जमा होणार?, महाराष्ट्रावर पुन्हा संकट, आणि ‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, वाचा टॉप १० बातम्या शालिनी ठाकरे काय म्हणाल्या? (Devendra Fadnavis) शालिनी ठाकरे यांनी ट्वीट करत लिहिले की, “एका चिमुकलीच्या मृत्यूनं महाराष्ट्र हळहळला आहे, आणि ह्या राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात विजय मिळाला म्हणून झालमुरी खातायत…ह्यांना लाज कशी वाटत नाही? ह्यांच्या संवेदना मेल्या आहेत का? देवाभाऊ किती निर्लज्जपणाचं प्रदर्शन ह्या महाराष्ट्राला घडवणार आहात?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव दरम्यान, गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा (TMC) दारुण पराभव करत भारतीय जनता पक्षाने बंगालमध्ये स्पष्ट बहुमत मिळवले आहे. २९४ सदस्यांच्या विधानसभेत भाजपने २०० हून अधिक जागांवर आघाडी घेत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. २०२१ मध्ये ७७ जागांवर अडकलेल्या भाजपने यावेळेस थेट २०० पार मजल मारली आहे. (Devendra Fadnavis) याकरिता देशभरात भाजपच्या नेतेमंडळी, कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. मात्र महाराष्ट्रातील पुण्यात नसरापूरसारखी घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी भाजपच्या विजयाचा आनंद साजरा केल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. (Devendra Fadnavis) हेही वाचा: Top 10 News : लाडक्या बहिणींच्या खात्यात ४५०० जमा होणार?, महाराष्ट्रावर पुन्हा संकट, आणि ‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, वाचा टॉप १० बातम्या