Nasrapur Case : गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना आरोपी करा, नसरापूर प्रकरणावरून राऊतांचा संताप
Nasrapur Case : संजय राऊत यांनी नसरापूर घटनेवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Nasrapur Case : संजय राऊत यांनी नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आरोपी करायला हवे. सरकारवर खटला चालवला पाहिजे,” अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. (Nasrapur Case)
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले की, राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना सातत्याने वाढत आहेत. “फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळली आहे. लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनाही वाढल्या आहेत,” असा आरोप त्यांनी केला. (Nasrapur Case)
तसेच, “राज्याची परिस्थिती गंभीर असताना मुख्यमंत्री इतर राज्यांमध्ये प्रचारात व्यस्त आहेत. गृहमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडण्यात अपयश आले आहे. नसरापूरसारख्या घटनेवर सरकारने माफी मागायला हवी,” असेही त्यांनी नमूद केले. (Nasrapur Case)
नवले पुलावरील आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईचाही त्यांनी निषेध केला. “जनतेचा आवाज दाबण्यासाठी लाठीचार्ज केला गेला. अशा परिस्थितीत सरकार, गृहमंत्री आणि पोलीस यांनाच जबाबदार धरले पाहिजे,” असे ते म्हणाले. (Nasrapur Case)
राऊतांनी पुढे आक्रमक भूमिका घेत, “हे राज्य सामान्य माणसासाठी राहण्यालायक उरलेले नाही. जनतेने सरकारला जाब विचारला पाहिजे,” असे आवाहन केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. (Nasrapur Case)





