Pune Crime : पुणे हादरलं ! भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला, परिसरात तणाव
शहरातील आंबेगाव पठार परिसरात एक धक्कादायक घटना (Pune Crime) उघडकीस आली असून, अज्ञात व्यक्तींनी एका इसमावर दगडाने ठेचून तसेच कोयत्याने वार करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

Pune Crime : शहरातील आंबेगाव पठार परिसरात एक धक्कादायक घटना (Pune Crime) उघडकीस आली असून, अज्ञात व्यक्तींनी एका इसमावर दगडाने ठेचून तसेच कोयत्याने वार करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी (Pune Crime) अचानक हल्ला चढवत संबंधित व्यक्तीवर गंभीर स्वरूपाचे वार केले. जखमी व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून आंबेगाव पठार परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान, हा हल्ला नेमका कोणत्या (Pune Crime) कारणावरून झाला याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. वैयक्तिक वाद, जुने वैर किंवा अन्य कारणांचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच संशयितांचा शोध सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात आला आहे.






