मुंबई – काल भारत विरुद्ध इंग्लड सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आणि या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. देशभरातील सर्वच क्रिकेट प्रेमींची नाराजी काल सोशल मीडियावर ओसंडून वाहत असलयाचे दिसून आले. पराभव झाल्याच्या दुःखापेक्षा अनेकांनी पूर्ण मॅचच वनसाईड झाल्याने खंत व्यक्त केली. यावेळी अनेकांनी ओरिओ बिस्किटवर बंदी घालण्याची मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भारताच्या पराभवाशी ओरिओ बिस्किटाचा तसा काहीही संबंध नाही परंतु नेटकऱ्यांनी एम एस धोनीच्या एका जाहिरातीचा संबंध देत ट्रोलिंग करायला सुरुवात केल्याचे दिसून आले. टी २० विश्वचषकापूर्वी धोनीने ओरिओ बिस्कीट नव्याने लॉंच केले होते. यावेळी धोनी म्हणाला होता,ओरिओ २०११ मध्ये लॉंच झाले होते त्यानंतर भारताने विश्वकप जिंकला होता. यावर्षी आणखी एक कप आहे जर ओरिओ पुन्हा लॉंच झाले तर भारत पुन्हा जिंकेल असं म्हणत धोनीने यावेळीही ओरिओचे लॉंचिंग केले होते.
Oreo For a Reason…#INDvsENG pic.twitter.com/7IwG6nRxei
— Cricpedia (@_Cricpedia) November 10, 2022
बिस्कीट तर लॉंच झाले परंतु दुर्दैवाने भारताला सेमी फायनलपर्यतच मजल मारता आली. यामुळे नेटकऱ्यांनी धोनीसह ओरिओला ट्रोल करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी काही जणांनी थेट ओरिओवर बंदीची मागणी केल्याचे सोशल मीडियावर दिसून येत आहे. झोमॅटो कंपनीने या पराभवापेक्षा ओरिओ भजीची टेस्ट चांगली असेल असं म्हणत ओरिओला टोला लगावला आहे.
oreo pakoda would taste a lot better than this defeat 🥲
— zomato (@zomato) November 10, 2022
काहींनी सोशल मीडियावर ओरिओचे मिम्स बनवायला देखील सुरुवात केली आहे. हे मिम्स तुफान व्हायरल होताना दिसत आहेत.
My Reaction Right Now. #Oreo #INDvsENG pic.twitter.com/vt8KLGKYkJ
— Babu Bhaiya (@Shahrcasm) November 10, 2022