PBKS vs DC : समीर रिझवीच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा शेवट गोड, पंजाबच्या ‘किंग्ज’वर भारी पडले कॅपिटल्स

PBKS vs DC Delhi Capitals beat Punjab Kings by 6 wickets : आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या संघांच्या पराभवाची मालिका सुरूच आहे. गुजरात आणि आरसीबीनंतर पंजाब किंग्जलाही पराभवाचा धक्का बसला आहे. समीर रिझवीच्या महत्त्वपूर्ण अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने पंजाबचा ६ विकेट्सनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने ८ विकेट्स गमावून २०६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीने १९.३ षटकांत विजयावर शिक्कामोर्तब केला.
समीर रिझवीने ठोकले नाबाद अर्धशतक –
युवा फलंदाज समीर रिझवीने आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकावले. रिझवीने २२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तो २५ चेंडूत ५८ धावा करत नाबाद राहिला. रिझवीने त्याच्या खेळीत ३ चौकार आणि ५ षटकार मारले. त्याने मार्कस स्टॉइनिसच्या चेंडूवर षटकार मारून सामना संपवला. करुण नायरने २७ चेंडूत ४४ धावा केल्या. त्याने ५ चौकार आणि २ षटकार मारले. दिल्लीने या विजयाने चालू हंगामातील आपल्या मोहिमेचा शेवट केला. त्याच वेळी, पंजाबच्या टॉप-२ मध्ये राहण्याच्या आशांना धक्का बसला आहे. सध्या, संघ १३ सामन्यांपैकी आठ सामने जिंकून १७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
Cheeky 🤝 Classy
Sameer Rizvi and Karun Nair with pressure releasing maximums in the chase 💥💥
Updates ▶ https://t.co/k6WP8zBwzL #TATAIPL | #PBKSvDC pic.twitter.com/ei8uDkkcdo
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2025
श्रेयस अय्यरने झळकावले अर्धशतक –
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जकडून प्रभसिमरन सिंगने २८ धावा केल्या. मात्र, प्रियांश आर्य फक्त ६ धावा करू शकला. जोश इंगलिसने ३२ धावा केल्या तर नेहल वधेराने १६ धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने एका टोकाला धरून ५३ धावांची खेळी केली. त्याला साथ देत मार्कस स्टोइनिसनेही १६ चेंडूत नाबाद ४४ धावा केल्या. ज्यामुळे पंजाब किंग्जचा संघ २०६ धावांपर्यंत पोहोचू शकला. दिल्ली कॅपिटल्सकडून मुस्तफिजूर रहमानने ३ तर विप्रज निगम आणि कुलदीप यादवने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
हेही वाचा –PBKS vs DC : पंजाबच्या फलंदाजाची विचित्र गच्छंती, वाइड बॉलवर गमावली विकेट
पंजाब किंग्जने २०६ धावांचा उभारला होता डोंगर –
यानंतर २०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुलने ३५ धावा केल्या तर फाफ डु प्लेसिसने २३ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या करुण नायरने ४४ धावांची शानदार खेळी केली. शेवटी, समीर रिझवीने फक्त २५ चेंडूत ५८ धावांची नाबाद खेळी केली. ज्यामध्ये त्याने ३ चौकार आणि ५ षटकारही मारले. यासह, दिल्ली संघाने आयपीएल २०२५ मधील शेवटचा सामना ६ विकेट्सने जिंकून शेवट गोड केला





