Sourav Ganguly Coach : दिल्लीत आता चालणार ‘दादागिरी’! सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्सचा नवा कोच; जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी घोषणा
Sourav Ganguly Coach : सौरव गांगुलीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्सने भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांची नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

IPL 2027 Delhi Capitals Appoint Sourav Ganguly As New Head Coach : आगामी इंडियन प्रीमियर लीग २०२७ (IPL 2027) च्या हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) फ्रँचायझीने सर्वात मोठा निर्णय जाहीर केला आहे. भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) मुख्य प्रशिक्षकपदी (Head Coach) नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्सने अधिकृत ‘एक्स’ हँडलवर एक खास व्हिडिओ पोस्ट करत, “दिल्ली, ही दादागिरीची वेळ आहे! सौरव गांगुली टायगर्सचे नवे हेड कोच,” अशी घोषणा केली आहे.
हेमंग बदानी यांची गच्छंती; दिल्लीचा सातवा नवा प्रयोग!
गेल्या मोसमापर्यंत दिल्लीचे मुख्य प्रशिक्षकपद माजी भारतीय क्रिकेटपटू हेमंग बदानी यांच्याकडे होते. आता ही धुरा गांगुलीकडे सोपवण्यात आली आहे. आजवर एकदाही आयपीएल ट्रॉफी न जिंकलेल्या मोजक्या संघांमध्ये दिल्लीचा समावेश होतो. गांगुलीपूर्वी दिल्लीने ग्रेगरी शिपर्ड, एरिक सायमन्स, गॅरी कर्स्टन, पॅडी अप्टन, रिकी पॉन्टिंग आणि हेमंग बदानी अशा ६ दिग्गजांना आजमावले होते; मात्र यश आले नाही. आता ‘दादां’वर पहिले जेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी असेल.
दिल्लीशी जुने नाते; सल्लागारापासून ते डायरेक्टर ऑफ क्रिकेटपर्यंत!
Dilli, it’s time for Dadagiri 🐅
Sourav Ganguly, Head Coach of the Tigers 🔥 https://t.co/EMTPQ9TB64
— Delhi Capitals (@DelhiCapitals) October 6, 2026
सौरव गांगुलीचा दिल्ली संघाशी अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध राहिला आहे. २०१९ मध्ये ते प्रथम दिल्लीचे सल्लागार झाले; मात्र बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पद सोडले. बीसीसीआयमधील कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी ‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’ म्हणून पुनरागमन केले आणि आयपीएलसह डब्ल्यूपीएलच्या (WPL) खेळाडू निवडीत महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रिटोरिया कॅपिटल्सला फायनलमध्ये नेण्याचा दांडगा अनुभव!
BREAKING: Sourav Ganguly has been appointed Delhi Capitals’ head coach ahead of IPL 2027
Ganguly takes over from Hemang Badani, who coached the team in IPL 2025 and 2026 https://t.co/tFUpw6Bomn
— Cricbuzz (@cricbuzz) October 6, 2026
दक्षिण आफ्रिकेतील ‘एसए२०’ (SA20) २०२५ च्या मोसमात गांगुलीने दिल्ली फ्रँचायझीच्या प्रिटोरिया कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली संघाने थेट अंतिम फेरी गाठली होती. हाच प्रशिक्षकपदाचा दांडगा अनुभव आता ते आयपीएलच्या मंचावर दिल्लीच्या मुख्य संघासाठी वापरणार आहेत.
गेल्या ५ वर्षांतील निराशाजनक कामगिरी सुधारण्याचे आव्हान!
२०२१ मध्ये दिल्लीने शेवटची प्लेऑफ फेरी गाठली होती, तर २०२० मध्ये संघ उपविजेता ठरला होता. २०२२ पासून सलग संघ ग्रुप स्टेजच्या पुढे जाऊ शकलेला नाही. गेल्या पाच मोसमांमधील हा निराशाजनक रेकॉर्ड मोडीत काढून दिल्लीला चॅम्पियन बनवण्याचे मोठे आव्हान आता गांगुलीच्या खांद्यावर असेल.





