PBKS vs DC : पंजाबच्या फलंदाजाची विचित्र गच्छंती, वाइड बॉलवर गमावली विकेट

PBKS vs DC Josh Inglis Got Stumped Out In Bizarre Mainer : जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर आयपीएलच्या ६६ व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स आमनसामने आले होते. या सामन्यात, जोश इंग्लिस आणि प्रभसिमरन सिंग यांनी पंजाबला चांगली सुरुवात करुन देतााना दिल्लीच्या वेगवान गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. मात्र लेग-स्पिनर विप्राज निगमने दोघांनाही लागोपाठ बाद करून दिल्लीचे सामन्यात कमबॅक केले. त्याने धावागतीवर अंकुश लावताना जोस इंग्लिसला आपल्या जाळ्यात अडकवले.
विप्राज निगमच्या जाळ्यात अडकला इंग्लिस-
जोश इंग्लिसने १२ चेंडूत ३२ धावा केल्या, तर प्रभसिमरन सिंगने १७ चेंडूत २८ धावा केल्या. इंग्लिसची विकेट्स डावाच्या सहाव्या षटकात मिळवली. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला होता. यानंतर तिसऱ्या चेंडुवर विप्राज निगमने माइंड गेम खेळला, ज्यात इंग्लिश फसला. विप्राजने लेग साइडला वेगवान चेंडू टाकला, ज्यावर इंग्लिस चौकार मारण्यासाठी पुढे सरसावला, पण त्याने चकवा खाल्ला आणि ट्रिस्टन स्टब्सने त्याला यष्टिचीत केले. त्यामुळे इंग्लिसला ३२ धावांवर परतावे लागले. त्याने ३ चौकार आणि २ षटकार मारले.
STUMPED!
6️⃣,4️⃣ & OUT!
Brilliant Presence of Mind by VIPRAJ NIGAM!
Saw JOSH INGLIS stepping out, bowled a WIDE outside leg stump!
TRISTAN STUBBS was Quick behind the Stumps!Inglis 32(12) | 3×4, 2×6 | S/R : 266.67
PBKS 55/2(5.2)#viprajnigam #JoshInglis #PBKSvsDC #ipl2025 pic.twitter.com/gt7c3blkBu
— Cricket Addiction (@CricketAdd1ct) May 24, 2025
प्रभसिमरन सिंगलाही केले बाद –
BOWLED!
Man in form PRABHSIMRAN SINGH Gone!
VIPRAJ NIGAM gets his 2nd!Prabhsimran 28(18) | 4×4, 1×6 | S/R : 155.56
PBKS 77/3(7.5)#viprajnigam #PrabhsimranSingh #PBKSvDC #PBKSvsDC #ipl2025 #cricketaddiction pic.twitter.com/8EFz0xjKHQ
— Cricket Addiction (@CricketAdd1ct) May 24, 2025
पुढच्याच षटकात विप्राज निगमने प्रभसिमरन सिंगलाही बाद केले. प्रभसिमरन सिंग २८ धावांवर खेळत होता. त्याने फाइन लेगच्या दिशेने स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो चेंडू पूर्णपणे चुकला. चेंडू लगेच स्टंपवर आदळला. यासह, पंजाब किंग्जचा स्कोअर आठ षटकांत ७७/३ झाला. यानंतर, कर्णधार श्रेयस अय्यरने डावाची जबाबदारी घेतली.
हेही वाचा – Sai Sudharsan : ‘देशासाठी खेळणे मोठा सन्मान…’, टीम इंडियात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया
पंजाबने दिल्लीसमोर ठेवले २०७ धावांचे लक्ष्य –
जयपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जने २० षटकांत आठ गडी गमावून २०६ धावा केल्या. त्यांच्याकडून श्रेयस अय्यरने ५३ आणि मार्कस स्टोइनिसने नाबाद ४४ धावा केल्या. दिल्लीकडून मुस्तफिजूर रहमानने तीन तर विप्राज निगम आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. त्याच वेळी, मुकेश कुमारला यश मिळाले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने दिल्लीसमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले.
हेही वाचा – ENG vs ZIM : इंग्लंडने २२ वर्षांनंतर ‘या’ देशाला कसोटीत चारली धूळ, शोएब बशीर ठरला गेमचेंजर
पंजाबसाठी विजय आवश्यक –
या सामन्यात पंजाब किंग्जला कोणत्याही परिस्थितीत जिंकणे आवश्यक आहे. या सामन्यापूर्वी पंजाब संघ १७ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. जर पंजाब संघाने आज विजय मिळवला तर टॉप २ मधील स्थान आणखी मजबूत होईल. अशा परिस्थितीत, पंजाब संघाला पहिला क्वालिफायर सामना खेळण्याची संधी मिळेल. ज्यामुळे त्यांना फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतील.





