WPL 2026 Auction : दीप्ती शर्मा ठरली WPL च्या इतिहासातील दुसरी सर्वात महागडी खेळाडू! यूपी वॉरियर्सने पाडला पैशांचा पाऊस

आरटीएम कार्डचा वापर आणि किंमत –
ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने दीप्तीवर ५० लाख रुपयांची पहिली बोली लावली. त्यानंतर, बोली वाढत जाऊन दिल्लीने थेट ३.२० कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. यूपी वॉरियर्सने याच रकमेवर आरटीएम कार्ड वापरले. हा आरटीएमचा वापर यूपी वॉरियर्ससाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आणि दीप्ती शर्मा पुन्हा त्यांच्या संघात सामील झाली. यासह दीप्ती शर्मा डब्ल्यूपीएल ऑक्शनच्या इतिहासातील दुसरी सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे.
Still in purple and yellow! 💜
🎥 Here’s how @Deepti_Sharma06 made it back to the @UPWarriorz for a MEGA bid of INR 3.2 Crore 💰#TATAWPL | #TATAWPLAuction pic.twitter.com/B1HdevJTlh
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) November 27, 2025
मेग लॅनिंगही यूपीमध्ये दाखल –
Meg Lanning is set to don the @UPWarriorz jersey 👌
An INR 1.9 Crore bid for the former Australian player 🙌#TATAWPL | #TATAWPLAuction pic.twitter.com/XQQQpeo6ot
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) November 27, 2025
दीप्ती शर्मासोबतच यूपी वॉरियर्सने ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगलाही संघात सामील करून आपली ताकद वाढवली आहे. लॅनिंगसाठी पण दिल्लीने मोठी बोली लावली, ज्यामुळे बोली १ कोटीच्या पुढे गेली. अखेरीस, यूपी वॉरियर्सने १.९० कोटी रुपये देऊन लॅनिंगला आपल्या ताफ्यात सामील केला.
हेही वाचा – Jemimah Rodrigues : मैत्रिणीसाठी कायपण…! जेमिमाने रॉड्रिग्जने स्मृती मानधनासाठी घेतला मोठा निर्णय
लॅनिंग यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार होती, परंतु मेगा ऑक्शनपूर्वी दिल्लीने तिला रिलीज करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता. लॅनिंग आता पहिल्यांदाच दिल्ली व्यतिरिक्त दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसणार आहे.
डब्ल्यूपीएलमधील सर्वात महागड्या खेळाडू –
दीप्ती शर्मा यापूर्वी यूपी वॉरियर्ससाठी २.२० कोटी रुपयांमध्ये खेळली होती. तिने तीन सीझनमध्ये यूपीसाठी २५ सामने खेळून ५०७ धावा केल्या, तसेच २७ विकेट्स घेतल्या. आता ३.२० कोटींची बोली लागल्याने ती ऑक्शन इतिहासातील दुसरी सर्वात महागडी खेळाडू बनली आहे.
सर्वात महागडी खेळाडू म्हणून स्मृती मानधना कायम आहे. तिला पहिल्या डब्ल्यूपीएलच्या पहिल्या ऑक्शनमध्ये आरसीबीने ३.४० कोटींना खरेदी केले होते. २०२४ मध्ये तिने आरसीबीला विजेतेपद मिळवून दिले आणि २०२६ सीझनपूर्वी आरसीबीने तिला ३.५० कोटी रुपयांना रिटेन केले आहे.





