लंडन – मि. जेम्स कॅलाघन यांची आज ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली. सत्ताधारी मजूर पक्षाच्या संसद सदस्यांच्या गुप्त मतदानात मि. कॅलाघन यांना 176 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी मायकेल फूट यांना 137 मते मिळाली आहेत.
आर्यभट्टचा उपयुक्त संदेश
नवी दिल्ली – आर्यभट्ट या उपग्रहाने पाठविलेल्या माहितीवरून अंतराळातील काळ्या छिद्रांवर प्रकाश पडू शकेल असे उपग्रह प्रकल्प संचालक यू आर राव म्हणाले.
संरक्षण उत्पादनात सामर्थ्य प्राप्त केले
नवी दिल्ली – संरक्षण उत्पादनात भारताने योग्य ते सामर्थ्य प्राप्त केले आहे, असे संरक्षण उत्पादन मंत्री विठ्ठलराव गाडगीळ म्हणाले. लोकसभेत पुरवणी मागण्या मांडताना ते बोलत होते. देशाला असलेला बाह्य धोका व त्यासंबंधात करण्यात येत असलेल्या उपाययोजना या प्रकरणी सरकारने जनतेला विश्वासात घ्यावे, अशी मागणी अनेक सदस्यांनी यावेळी केली. संरक्षणदृष्ट्या राष्ट्र बलवान होऊन कोणतेही आक्रमण थोपवू शकेल, असे मार्क्सवादी खासदार दशरथ देब म्हणाले.