Nevasa News : नेवासे हादरले! व्यापाऱ्याच्या घरातून ५ लाखांची रोकड लंपास
Nevasa News : नेवासा शहरातील विवेकानंद कॉलनी या मध्यवर्ती आणि उच्चभ्रू परिसरात गुरुवारी (१ ऑक्टोबर) मध्यरात्री घरफोडीची एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

Nevasa News : नेवासा शहरातील विवेकानंद कॉलनी परिसरात व्यापाऱ्याच्या घरात चोरी झाल्याची घटना गुरुवारी (दि. २) मध्यरात्री घडली. अज्ञात चोरट्याने घराच्या खिडकीचे गज तोडून आत प्रवेश करत कपाटातील सुमारे ५ लाख रुपयांची रोकड लंपास केली. (Nevasa News)
जगताप बंधू मिठाईवाले म्हणून परिचित असलेले व्यापारी तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे विश्वस्त रामभाऊ जगताप यांच्या घरी ही चोरी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास कुटुंबीय झोपेत असताना चोरट्याने खिडकीचे गज तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाट फोडून त्यातील रोकड घेऊन तो पसार झाला. (Nevasa News)
पहाटेच्या सुमारास कपाट उघडे असल्याचे आणि त्यातील रोकड गायब असल्याचे जगताप यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ कुटुंबीयांना तसेच नेवासा पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. (Nevasa News)
माहिती मिळताच सहाय्यक फौजदार नागरगोजे आणि पोलीस कॉन्स्टेबल गवळी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील रहिवासी परिसरातच चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. (Nevasa News)
Nevasa News : देवगड दर्शनासाठी निघालेल्या अंगणवाडी सेविकेचे अपहरण; मारहाण करून 96 हजारांचा ऐवज लुटला





