Ishwarpur News : वाळवा व शिराळा तालुक्यात दुष्काळ सर्वेक्षणाचे आदेश; सम्राट महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश
Ishwarpur News : सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या भीषण दुष्काळसदृश परिस्थितीची दखल अखेर राज्य सरकारने घेतली आहे.

Ishwarpur News : सांगली जिल्ह्यातील वाळवा व शिराळा तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. (Ishwarpur News)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळवा व शिराळा तालुक्यांमध्ये दुष्काळ सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले असून प्रमुख पाच पिकांचे २० टक्के ग्राउंड ट्रुथिंग सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Ishwarpur News)
वाळवा व शिराळा तालुक्यांमध्ये पावसाची अनियमितता आणि पावसातील खंडामुळे खरीप पिकांचे नुकसान होत असल्याने दुष्काळी यादीत या तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी सम्राट महाडिक यांनी केली होती. (Ishwarpur News)
त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. शासनाने वाळवा व शिराळा तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी सर्वेक्षणाचा निर्णय घेतला आहे. (Ishwarpur News)
सर्वेक्षणादरम्यान प्रमुख पाच पिकांचे २० टक्के ग्राउंड ट्रुथिंग करून त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवणे आणि प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत. (Ishwarpur News)
महाडिक यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याने वाळवा-शिराळ्यातील शेतकऱ्यांच्या दुष्काळी परिस्थितीचा शासन स्तरावर फेरआढावा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यासाठी महाडिक यांचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वेक्षणाच्या अहवालानंतर पुढील निर्णय होणार असल्याने या भागातील शेतकऱ्यांचे लक्ष आता सर्वेक्षणाच्या निष्कर्षांकडे लागले आहे. (Ishwarpur News)
Ishwarpur News : ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अपात्रतेला स्थगिती
Ishwarpur News : ईश्वरपूरमधील मोर्चात हजारो युवक रस्त्यावर; सदाभाऊ खोत यांच्या राजीनाम्याची मागणी





