कडूस, (वार्ताहर)- येथील ढमाले शिवारात नातेवाईकाचे निधन झाल्याने सर्व शिवारातील, भावकीतील तसेच भाविक नातेवाईकांनी सुतक धरले होते. कडूसच्या ढमाले शिवारात साधारणपणे दिडशेच्या आसपास कुटूंबे असून साधारणपणे आठशे लोकसंख्या आहे.
22 एप्रिल रोजी कडूसच्या ढमाले शिवार वगळून सगळ्या वाड्या वस्तीसह गावठाणातील लहान थोरांकडून श्री भैरवनाथ महाराजांचा चांगभलंचा जयघोष करीत, भंडा-याची उधळण करीत, श्री भैरवनाथ चरणी दंडवताचा कार्यक्रम झाला होता.
ढमाले शिवारातील ढमाले या एकाच आडनावांची भावकीतील, नात्यातील लोक आहेत. येथील व्यक्तीच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी सुतक पाळले होते. दहा दिवसांचे सुतक संपल्यानंतर, शिवारातील सर्व नागरिकांनी एक विचाराने रविवारी (दि. 28) रोजी लहान थोरांकडून, वाद्यांच्या गजरात चंद्रकांत ढमाले, नयन ढमाले, अमोल ढमाले, शामराव ढमाले दादाभाऊ ढमाले, चांगदेव ढमाले, पंढरीनाथ ढमाले यांच्या पुढाकाराने दंडवताचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.