CSK vs DC : ‘मला वाटलं नव्हतं की इतक्या सहज…’, सीएसकेचा एकतर्फी पराभव केल्यानंतर अक्षर पटेलच मोठं वक्तव्य

CSK vs DC Axar Patel says I didnt expect it to be easy : दिल्ली कॅपिटल्स (डीसी) ने आयपीएल २०२५ मध्ये विजयाची हॅटट्रिक नोंदवली आहे. शनिवारी डीसीने चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) विरुद्ध २५ धावांनी विजय मिळवला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर १८४ धावांचे लक्ष्य ठेवल्यानंतर डीसीने सीएसकेला वर्चस्व गाजवण्याची एकही संधी दिली नाही. दिल्ली फ्रँचायझीने १६ वर्षांत प्रथमच हंगामातील पहिले तीन सामने जिंकले आहेत. दिल्लीने २००९ मध्येही असेच केले होते. या विजयानंतर कर्णधार अक्षर पटेलने दिलेली प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
अक्षर पटेलने विजयानंतर काय प्रतिक्रिया दिली –
डीसीचा कर्णधार अक्षर पटेलने सीएसकेला हरवताना आपला उत्साह दाखवला. डीसी विरुद्ध सीएसके सामन्यानंतर, जेव्हा ३१ वर्षीय फिरकीपटू अक्षरला सलग तीन विजयांबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, आम्ही इतक्या सहज जिंकू असे त्याला वाटले नव्हते. चेन्नईपूर्वी डीसीने सनरायझर्स हैदराबादला ७ विकेट्सने आणि लखनऊ सुपर जायंट्सला १ विकेट्सने हरवले होते.
Hat-Trick of Wins ✅
Memorable win at Chepauk after 1⃣5⃣ years ✅@DelhiCapitals cap off a commanding 2⃣5⃣-run victory over #CSK 🥳Scorecard ▶ https://t.co/5jtlxucq9j #TATAIPL | #CSKvDC pic.twitter.com/D9oWDI4hN2
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2025
‘मला वाटले नव्हते इतक्या सहज जिंकू’ –
सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना अक्षर पटेल म्हणाला की, “मला वाटले नव्हते की आम्ही इतक्या सहज जिंकू. सर्व खेळाडूंनी योगदान दिल्याने संघाचे संतुलन चांगले होते. कर्णधार म्हणून तीनपैकी तीन सामने जिंकणे ही एक चांगली भावना आहे. संघाच्या बैठकींमध्ये, चर्चा प्रभाव पाडण्याबद्दल असतात, जे खूप महत्वाचे आहे.” सीएसकेविरुद्ध जास्त गोलंदाजी न करण्याबद्दलही दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराने प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – PBKS vs RR : आऊट झाल्यानंतर संतापला संजू सॅमसन; रागाच्या भरात केलं असं काही की…VIDEO होतोय व्हायरल
‘मी स्वतःला वाचवत होतो’ – अक्षर पटेल
अक्षर पटेल पुढे म्हणाला, “मी स्वतःला वाचवत होतो. माझ्या बोटालाही दुखापत झाली आहे. मला गोलंदाजी करायची होती पण ही एक मोठी स्पर्धा असल्याने कोणताही धोका पत्करायचा नव्हता. आम्ही चांगली सुरुवात नक्कीच केली आहे, पण आयपीएल ही एक मोठी स्पर्धा आहे. अजून बरेच सामने बाकी आहेत. त्यामुळे कधी पण काहीही बदलू शकते.” या सामन्यात अक्षरने फक्त एक षटक टाकले आणि पाच धावा दिल्या.
हेही वाचा – CSK vs DC : सलग तिसऱ्या पराभवानंतर ऋतुराज गायकवाड संतापला; म्हणाला, ‘सर्वांना एकत्र यावे लागेल, अन्…’
सामन्याबद्दल बोलायचे तर, दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना केएल राहुलच्या (५१ चेंडूत ७७ धावा) शानदार अर्धशतकाच्या जोरावर डीसीने ६ बाद १८३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सीएसके संघाला निर्धारित २० षटकांत पाच गडी बाद फक्त १५८ धावा करता आल्या. दिल्लीच्या विप्रज निगमने दोन तर कुलदीप यादव, मिशेल स्टार्क आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.





