PBKS vs RR : आऊट झाल्यानंतर संतापला संजू सॅमसन; रागाच्या भरात केलं असं काही की…VIDEO होतोय व्हायरल

PBKS vs RR Sanju Samson lost his temper video viral : आयपीएल २०२५ चा १८ वा सामना मुल्लानपूर महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर यजमान पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने यशस्वी जैस्वालच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाबला २०६ धावांचे लक्ष्य दिले आहे. दरम्यान या सामन्यात संजू सॅमसनने बाद झाल्यानंतर, जे काही केलं त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्स अशा प्रकारे फलंदाजी करण्यासाठी उतरले आणि पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली. तथापि, राजस्थानला कर्णधार संजू सॅमसनच्या रूपाने पहिला धक्का बसला. अशा परिस्थितीत, संजू सॅमसन बाद झाल्यानंतर रागावलेला दिसत होता. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संजू सॅमसनने बाद झाल्यानंतर गमावला संयम –
A timely wicket for #PBKS & Sanju's reaction says it all 🥲
Watch LIVE action ➡ https://t.co/Ydn8W1CxFx#IPLonJioStar 👉 #PBKSvRR | LIVE NOW on Star Sports Network & JioHotstar! pic.twitter.com/Dz1bTMp0hU
— Star Sports (@StarSportsIndia) April 5, 2025
मुल्लानपूर येथे यजमान पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हा सामना खेळला जात आहे. या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या हंगामातील पहिल्या सामन्यात पंजाबच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून राजस्थानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. राजस्थान रॉयल्सकडून सलामी देण्यासाठी आलेल्या संजू आणि यशस्वीच्या जोडीने तुफान फटकेबाजी करत पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची शानदार भागीदारी केली. मात्र, त्यानंतर संजू सॅमसन २६ चेंडूत ३८ धावा काढून लॉकी फर्ग्युसनच्या षटकात बाद झाला.
हेही वाचा – CSK vs DC : सलग तिसऱ्या पराभवानंतर ऋतुराज गायकवाड संतापला; म्हणाला, ‘सर्वांना एकत्र यावे लागेल, अन्…’
खरं तर, कव्हर्सवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न करत असताना, त्याने फर्ग्युसनच्या १४४.२ किमी प्रति तासाच्या चेंडूवर मिड-ऑफवर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या हाती झेल देऊन बाद झाला. मात्र, बाद झाल्यानंतर, संजू सॅमसन स्वतःवर प्रचंड नाराज दिसला. त्याने रागाच्या भरात संयम गमावला आणि जोरात बॅट हवेत भिरकवली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सामन्याबद्दल बोलायचे, तर राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जला विजयासाठी २०६ धावांचे लक्ष्य दिले आहे. संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांनी राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली. यशस्वीने ४५ चेंडूंचा सामना करत ६७ धावा केल्या. त्याने ३ चौकार आणि ५ षटकार मारले. सॅमसनने ३८ धावांची खेळी खेळली. त्याने ६ चौकार मारले. शिमरॉन हेटमायर २० धावा करून बाद झाला. रियान पराग ४३ धावा करून नाबाद राहिला. त्याने २५ चेंडूंचा सामना केला आणि ३ चौकार आणि ३ षटकार मारले.





