Ramakrishna Ghosh : महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने सार्थ ठरवला सीएसकेचा विश्वास! विजय हजारे ट्रॉफीत केला मोठा पराक्रम

डोमिनिक मुथुस्वामींचा मोडला विक्रम –
रामकृष्ण घोषची ही कामगिरी विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात महाराष्ट्राच्या कोणत्याही गोलंदाजाकडून करण्यात आलेली सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम डोमिनिक मुथुस्वामी यांच्या नावावर होता, ज्यांनी २०१४ मध्ये मुंबईविरुद्ध ६ विकेट्स घेतल्या होत्या. आता ११ वर्षांनंतर रामकृष्णने ७ विकेट्स घेत हा नवा पराक्रम केला आहे.
हिमाचलच्या फलंदाजांनी पत्करली शरणागती –
Performance of the Day from Ramakrishna Ghosh 💛🔥#VijayHazareTrophy #WhistlePodu #CSK pic.twitter.com/YjecWwAJ23
— WhistlePodu Army ® – CSK Fan Club (@CSKFansOfficial) December 29, 2025
रामकृष्ण घोषच्या धारदार गोलंदाजीसमोर हिमाचल प्रदेशचे फलंदाज पूर्णपणे हतबल दिसले. त्याने आपल्या ९.४ षटकांच्या स्पेलमध्ये हिमाचलच्या पहिल्या चारही फलंदाजांना बाद करून त्यांची कंबर तोडली. यामुळे हिमाचलचा संघ ५० षटकेही पूर्ण खेळू शकला नाही आणि २७० धावांवर सर्वबाद झाला. विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात ७ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा रामकृष्ण हा आता १२ वा गोलंदाज ठरला आहे.
हेही वाचा – Shubman Gill : ‘विराटची ऊर्जा वेगळ्या उंचीची, गिलला ते कधीच जमणार नाही!’, इग्लंडच्या माजी खेळाडूची टीका
बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये ‘ऑलराउंड’ चमक –
रामकृष्ण केवळ गोलंदाजीतच नव्हे, तर फलंदाजीतही चमकदार कामगिरी करत आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात त्याने पंजाबविरुद्ध ७३ धावांची तुफानी खेळी केली होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्याच्या नावावर २ अर्धशतकांची नोंद आहे. जरी टी-२० क्रिकेटमध्ये त्याची आकडेवारी (९ सामन्यात २ विकेट्स आणि ४५ धावा) सध्या मर्यादित असली, तरी त्याचा सध्याचा फॉर्म पाहता आगामी आयपीएल हंगाम त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
हेही वाचा – Babar Azam : मैदानावर फ्लॉप अन् वादात टॉप! बाबरच्या एका ‘ऑटोग्राफ’मुळे पेटला नवा वाद; नेमकं प्रकरण काय?
सीएसकेचा विश्वास ठरवला सार्थ –
आयपीएल २०२५ च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने रामकृष्ण घोषला ३० लाख रुपयांना खरेदी केले होते. २०२५ च्या हंगामात त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही, तरीही संघ व्यवस्थापनाने त्याच्यातील प्रतिभा ओळखून त्याला २०२६ च्या हंगामासाठी रिटेन केले. घरगुती क्रिकेटमधील या शानदार कामगिरीमुळे ‘सीएसके’चा हा निर्णय किती अचूक होता, हे आता सिद्ध होत आहे.





