Babar Azam : मैदानावर फ्लॉप अन् वादात टॉप! बाबरच्या एका ‘ऑटोग्राफ’मुळे पेटला नवा वाद; नेमकं प्रकरण काय?

Babar Azam Indian Jersey Autograph Controversy : पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम सध्या ऑस्ट्रेलियन भूमीवर बिग बॅश लीग (BBL) खेळत आहे. मात्र, एका सामन्यादरम्यान त्याने केलेल्या कृतीमुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. बाबरने भारतीय संघाची जर्सी घातलेल्या एका महिला चाहत्याला त्याच जर्सीवर ऑटोग्राफ दिला, ज्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते प्रचंड नाराज झाले आहेत.
नेमका वाद काय?
बिग बॅश लीगच्या सामन्यादरम्यान टीम इंडियाची जर्सी परिधान केलेली एक चाहती बाबर आझमकडे ऑटोग्राफ घेण्यासाठी आली. बाबरने खिलाडूवृत्ती दाखवत केवळ त्या जर्सीवर आपली स्वाक्षरीच केली नाही, तर त्या चाहतीसोबत सेल्फी देखील काढला. भारत आणि पाकिस्तानमधील सध्याचे तणावपूर्ण संबंध पाहता, भारतीय जर्सीवर पाकिस्तानी खेळाडूने ऑटोग्राफ देणे चाहत्यांना आवडलेले नाही.
🚨Babar Azam meet an Indian fan and signed her jersey ❤ pic.twitter.com/0W9GNVmosi
— INAYAT (@Inayattttt_56) December 28, 2025
अनेकांनी याला ‘भारतीय जर्सीचा अपमान’ असे संबोधत बाबरवर टीका केली आहे. दुसरीकडे, या प्रकरणामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) बाबरवर काय कारवाई करणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
मैदानावरही बाबरची पाटी कोरीच –
एकीकडे वादात अडकलेला बाबर आझम दुसरीकडे मैदानातही धावा काढण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी त्याला पाकिस्तान संघात स्थान देण्यात आलेले नाही. सध्या तो बिग बॅश लीगमध्ये ‘सिडनी सिक्सर्स’ कडून खेळत आहे, मात्र तिथेही त्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे:
हेही वाचा – Dhruv Jurel Century : ध्रुव जुरेलचा शतकी धमाका! चौकार-षटकारांची बरसात करत ठोकली टीम इंडियात दावेदारी
- सामने: ४
- एकूण धावा: ७१
- सरासरी: १७.७
- स्ट्राइक रेट: ११० विशेष म्हणजे, ४ पैकी ३ डावांत त्याला दुहेरी धावसंख्याही गाठता आलेली नाही.
श्रीलंका मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर; दिग्गज बाहेर
पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघातून बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांसारख्या मोठ्या नावांना डच्चू देण्यात आला आहे. या मालिकेत शादाब खानचे संघात पुनरागमन झाले असून सलमान अली आगा याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
हेही वाचा – Sonam Yeshey : क्रिकेट जगतात खळबळ! २२ वर्षीय गोलंदाजाचा टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड
पाकिस्तानचा टी-२० संघ: सलमान अली आगा (कर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर झमान, ख्वाजा नाफे, मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, साहिबजादा फरहान, सैम अयुब, शादाब खान, उस्मान खान, उस्मान तारिक.





