नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत 2,34,281 लोकांना नव्याने करोनाची लागण झाल्याने, भारतातील एकूण रुग्णांची संख्या 4.10 कोटींहून अधिक झाली आहे. 24 तासांच्या कालावधीत 893 मृत्यूंसह देशातील एकूण करोना मृतांचा आकडा 4,94,091 वर पोहोचला आहे,
सक्रिय करोना बाधितांची संख्या 1,19,396 ने घटून 18,84,937 पर्यंत पोहोचली आहे. हा दर एकूण संसर्गाच्या 4.59 टक्के इतका झाला आहे. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 3,87,13,494 वर पोहोचली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.20 टक्के नोंदवले गेले आहे. देशातील एकूण रूग्णांची संख्या 4 कोटी 10 लाख 92 हजार 522 वर गेली आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत कोविड लस देण्यात आलेल्या नागरीकांची एकत्रित संख्या 165.70 कोटींच्या पुढे गेली आहे.