Corona Update : करोनाचा विळखा आणखी घट्ट.! रुग्णसंख्येने गाठला मोठा उच्चांक, तर ‘या’ दिवशी होणार मॉक ड्रील

मुंबई – ‘करोना’ या तीन अक्षरी शब्दांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी जगभरात मोठा धुमाकुळ घातला होता. जगात करोनाची कोट्यावधी लोकांना लागण झाली. तर करोनामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाल्याचं आपण पाहिलं आहे. दरम्यान, अश्यातच आता करोनाने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील अनेक मोठ्या शहरांमध्ये सध्या करोना रुग्णसंख्या अतिशय वेगाने वाढत असल्याचं चित्र दिसून येत आहे.
नुकतंच आलेल्या ताज्या अहवालानुसार, राज्यात दिवसभरात तीन करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, चोवीस तासांत 678 रुग्ण कोविडमुक्त झाले असून, आतापर्यंत 79 लाख 95 हजार 232 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या आठ कोटी 66 लाख 75 हजार 772 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 09.40 टक्के नमुने पाॅझिटिव्ह आले आहेत. राज्यात आतापर्यंत 81 लाख 47 हजार 673 कोविड रुग्णांची नोंद आहे.
दरम्यान, नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. तसेच काही महत्वाच्या सूचना देखील नागरिकांना देण्यात आल्या आहेत. देशामध्ये दिवसेंदिवस करोनाचं संकट वाढत आहे. आणि त्याच अनुषंगाने आता देशभरात 10 आणि 11 एप्रिल रोजी मॉक ड्रील होणार आहे.
Union Health Minister Dr Mansukh Mandaviya virtually interacted with State Health Ministers and Principal Secretaries/ Additional Chief Secretaries, today.
Union Health Minister advised States to be on the alert and keep all preparedness for COVID-19 management. He urged the… pic.twitter.com/CS7QRihcDm
— ANI (@ANI) April 7, 2023
नुकतंच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आज राज्यांतील आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी मॉक ड्रीलबद्दल देखील माहिती दिली. त्यामुळे देशभरात 10 आणि 11 एप्रिल रोजी मॉक ड्रील घेण्यात येईल. यामध्ये बेड कॅपॅसिटी, मेडिसिन, ऑक्सिजन पुरवठा याबाबत केंद्रीय आरोग्य विभाग आढावा घेणार आहे. असं यावेळी सांगण्यात आलं आहे.





