पुणे – राज्य ग्राहक आयोगाकडून न्याय मिळविण्यासाठी ग्राहकांना सहा महिने वाट पहावी लागणार आहे. आयोगाच्या सर्किट बेंचची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
करोनामुळे सध्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पुण्यात होणारी सुनावणी आता थेट पुढच्या वर्षीच होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना सुनावणीसाठी आणखी वाट पहावी लागणार आहे.
सर्किट बेंचची सुनावणी पुण्यात या महिन्यात 12 ते 16 ऑक्टोबरदरम्यान होणार होती. मात्र ती पुढे ढकलली आहे.
ऑक्टोबरमध्ये होणारी ही सुनावणी आता मार्च 2021 मध्ये होणार आहे. राज्य आयोगाने काढलेल्या परिपत्रकात याबाबत नमूद केले आहे. तसेच, सुनावणीसाठी असलेल्या दाव्यांना पुढील तारखा दिल्या आहेत.