नागपूर – सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी कॉंग्रेस आमदार सुनील केदार यांना एका वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2017 मध्ये महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज हा निर्णय दिला आहे.
नागपूर येथील केळवद पोलीस स्टेशनमध्ये सुनील केदार यांच्याविरोधात सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. 2017 मध्ये कोराडी ते तिडंगीदरम्यान अतिउच्च दाबवाहिनीचे काम करणाऱ्या महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना सुनील केदार यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
कॉंग्रेस आमदार सुनील केदार यांना नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने 353 च्या गुन्हयात 1 वर्षांची शिक्षा व दोन हजार रुपयाचा दंड सुनावला आहे. या प्रकरणी केळवद पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली होती. या प्रकरणात आज नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने सुनील केदार यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली.