राजस्थान – पत्नीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार राजस्थानमधील डूंगरपुर जिल्ह्यातील साबला येथे घडला आहे. ह्त्या केल्यानंतर पत्नी पसार झाली आहे. या घटनेनंतर मृत मुलाच्या आईने पोलिसात सुनेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
साबला पोलिसांनी सुनेचा तपास करण्यास सुरुवात केली असून घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासले असता पत्नी कांता 23 ऑगस्ट रोजी खोली बंद करीत असल्याचे पोलिसांना दिसून आले आहे.
नाथू यादव असे मृत मुलाचे नाव असून बेवा गलाब यादव असे त्याच्या आईचे नाव आहे. कांता यादव असे आरोपी पत्नीचे नाव आहे. नाथू व कांता यांचा सहा महिन्यांपुर्वीच विवाह झाला होता. लग्नानंतर दोघे मुगेड गावात खोली भाड्याने घेऊन राहत होते. दोघेही मजुरी करून घर चालवत होते.
23 ऑगस्ट रोजी नाथूची पत्नी त्यांच्या घरी आली होती. तिने सांगितलं की, मी तुझ्या मुलाची हत्या केली आहे. आता मी तुमच्या घरात राहणार. मुंगेडमध्ये त्याच्या घरावर टाळं लावलं होते. असे मृत मुलाच्या आईने माहिती देताना सांगितले आहे.
दरम्यान, हे पती- पत्नी भाड्याच्या खोलीत राहत होते, त्या खोलीतून शुक्रवारी दुर्गंधी येऊ लागली. खोलीतून किडे निघत होते. जवळपासच्या लोकांनी खिडकीतून पाहिलं तर आत मृतदेह पडला होता. यानंतर लोकांनी पोलिसांना सूचना दिली. यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दार उघडून पाहिले असता घरात नाथूचा मृतदेह पडला होता आणि त्याला किडे लागले होते. मृतदेह चार दिवसांपासून येथे पडून होता, त्यामुळे शरीर काळं पडलं होतं आणि दुर्गंधी येत होती.