School Timing Change: महापालिका हद्दीतील शाळांच्या वेळेत मोठा बदल, ३१ ऑगस्टपर्यंत ‘हे’ असतील नियम
School Timing Change: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेमुळे पुणे महापालिका हद्दीतील प्राथमिक शाळांच्या वेळेत तात्पुरता फेरबदल.

School Timing Change – केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या कामकाजाची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. शिक्षकांना हे कामकाज करता यावे व विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक होऊ नये, यासाठी प्राथमिक शाळांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे. सकाळी ७ ते दुपारी १२.१५ वा. अशी शाळांची वेळ राहणार असून, हा बदल ३१ ऑगस्टपर्यंत असणार आहे.
निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. हा राष्ट्रीय कार्यक्रम योग्यरीतीने व ठरलेल्या कालमर्यादेत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. विशेष सखोल पुनरीक्षणाचे कामकाज कालावधीत पूर्ण करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याने शिक्षकांना संपूर्ण वेळेसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती न देता त्यांना सुट्टीच्या दिवशी, ( School Timing Change)

School Timing Change: महापालिका हद्दीतील शाळांच्या वेळेत मोठा बदल, ३१ ऑगस्टपर्यंत ‘हे’ असतील नियम
तसेच शैक्षणिक कामाच्या वेळेनंतर कामकाज करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. ज्या इमारतीमधील शाळांची वेळ सकाळी ९ ते दुपारी ३.२० वा. आहे, त्या सर्व शाळा सकाळी ७ ते दुपारी १२.१५ वा. या वेळेमध्ये भरतील. ज्या शाळा सकाळच्या सत्रामध्ये भरतात, त्यांची वेळ ही सकाळी ७ ते दुपारी १२.१५ वा. अशीच राहील. ( School Timing Change)
ज्या शाळा दोन सत्रांमध्ये भरत असतील, अशा दुपारी भरणाऱ्या शाळांची वेळ ही दुपारी १२.२५ ते सायंकाळी ५.३० वा. अशीच राहील. शालेय वेळेमध्ये केलेल्या बदलाची विद्यार्थी व पालकांना माहिती द्यावी, अशा सूचना पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या उपायुक्त वसुंधरा बारवे, प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे यांनी सर्व माध्यमांच्या महापालिका व खाजगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. (School Timing Change)





