Pune gold jewellery : रावेतमध्ये चंदुकाका सराफ ज्वेल्सचे 26वे दालन; 31 ऑक्टोबरपासून विशेष ऑफर्स
Pune gold jewellery : चंदुकाका सराफ ज्वेल्सचे २६वे प्राईम स्टोअर रावेतमध्ये ३१ ऑक्टोबरला सुरू होत आहे. सोन्या, हिऱ्यांच्या आणि चांदीच्या दागिन्यांवर विशेष ऑफर्स जाहीर.

Pune gold jewellery : दागिन्यांच्या क्षेत्रातील सुमारे २०० वर्षांची परंपरा जपणाऱ्या चंदुकाका सराफ ज्वेल्सचे २६वे प्राईम स्टोअर रावेत येथे सुरू होत आहे. नवीन दालनाचा भव्य उद्घाटन सोहळा ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
सुमारे २०० वर्षांचा शुद्ध सोन्याचा वारसा पुढे नेत ग्राहकांना चांगली गुणवत्ता, आकर्षक डिझाइन्स आणि पारदर्शक व्यवहाराचा अनुभव देण्याच्या उद्देशाने हे दालन सुरू करण्यात आले आहे. रावेत आणि परिसरातील ग्राहकांसाठी ही नवीन शाखा महत्त्वाची ठरणार आहे.
उद्घाटनानिमित्त ग्राहकांसाठी विशेष मेगा ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. सोन्याच्या दागिन्यांवर मजुरी ३.९९ ते ९.९९ टक्के प्रति ग्रॅम, तर हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर १०० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. तसेच, चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर ३० टक्के फ्लॅट सूट मिळणार आहे. या ऑफर्स ३१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत लागू असतील.
चंदुकाका सराफ ज्वेल्सचे हे नवीन प्राईम स्टोअर सर्व्हे नं. ९५, प्रतिभा अव्हेन्यू, भोंडवे बागेसमोर, रावेत, पुणे येथे सुरू होत आहे. आधुनिक सुविधा आणि दर्जेदार सेवेसह ग्राहकांना खरेदीचा अनुभव देण्यासाठी दालन सज्ज आहे.
सणासुदीच्या आणि आगामी शुभमुहूर्तांच्या पार्श्वभूमीवर नवीन डिझाइन्समधील सोन्याचे दागिने खरेदी करण्याची ही संधी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ग्राहकांनी कुटुंबासह नवीन शाखेला भेट देऊन ऑफर्सचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक सिद्धार्थ शहा आणि आदित्य शहा यांनी केले आहे.





