Pune : नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी
Pune : पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या २९ नगरसेवकांनी सप्टेंबरचे संपूर्ण मानधन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले.

Pune : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे महापालिकेतील २९ नगरसेवकांनी सप्टेंबर महिन्याचे संपूर्ण मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमांतर्गत जमा झालेला धनादेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हे योगदान दिले. दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना आर्थिक आधार मिळावा आणि त्यांच्या मदतीसाठी आपलाही खारीचा वाटा असावा, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, महापौर मंजुषा नागपुरे आणि पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन मदतनिधीस देऊन सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचा प्रयत्न केला. संकटाच्या काळात गरजूंच्या मदतीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे, हीच लोकसेवेची खरी भावना असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.





