Pune News : मुंढवा येथे पर्यायी जागा देऊनही अतिक्रमण; गोठेधारकांवर महापालिकेची कारवाई
अतिक्रमण केलेल्या गोठेधारकांना जागा रिकामी करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या असून, काही गोठ्यांना ताळे ठोकून ते सीलबंद करण्यात आले आहे.

Pune News : पुणे महापालिकेच्या वतीने जनावरांसाठी गोठे उभारण्याकरिता केशवनगर, मुंढवा येथील जागा गोठेधारकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे असतानाही महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून गोठे चालविणाऱ्या गोठेधारकांविरोधात महापालिका प्रशासनाने कारवाई केली आहे. अतिक्रमण केलेल्या गोठेधारकांना जागा रिकामी करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या असून, काही गोठ्यांना ताळे ठोकून ते सीलबंद करण्यात आले आहे.
महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमणे हटविण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली. गोठेधारकांना जनावरे ठेवण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिलेली असतानाही महापालिकेच्या जागेचा अनधिकृत वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने संबंधितांवर कारवाईचा निर्णय घेतला.
पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. संबंधित गोठेधारकांना जागा खाली करण्याबाबत नोटिसा देऊन अतिक्रमित जागा रिकामी करण्याची सूचना करण्यात आली. तसेच, कारवाईदरम्यान काही गोठ्यांना ताळे ठोकून सीलबंद करण्यात आले.
महापालिकेच्या जागेचा अनधिकृत वापर रोखणे आणि उपलब्ध करून दिलेल्या जागेचा नियमानुसार वापर सुनिश्चित करणे, या उद्देशाने प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या मालकीच्या जागांवरील अतिक्रमणांवर पुढील काळातही कारवाई केली जाणार असल्याचे उपायुक्त





