Happy Birthday Mohammad Azharuddin : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू मोहम्मद अझरुद्दीनने आपल्या कारकिर्दीत अनेक वेळा मॅच विनिंग कामगिरी केली. त्याने भारतासाठी 300 हून अधिक एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याचवेळी त्याने भारतीय संघासाठी 99 कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व देखील केले. अझहरची कारकीर्द अडचणींनी(वादग्रस्त) भरलेली होती. आज तो आपला 61 वा वाढदिवस (8 February 1963) साजरा करत आहे. यानिमित्ताने अजहरच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे किस्से जाणून घेऊया…
वास्तविक, अझरुद्दीनवर 2000 साली मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली बंदी घालण्यात आली होती. त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. मात्र, 2012 मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने ही आजीवन बंदी फेटाळली होती. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती आणि त्याचे करिअर उद्ध्वस्त झाले होते.
क्रिकेटनंतर तो राजकारणाकडे वळला. अझहरने 2009 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून संसदेत प्रवेश केला. त्याआधी 2014 च्या निवडणुकीत त्याला पराभवाला सामोरं जावे लागले होते.
वैयक्तिक आयुष्यातही होते चढ-उतार…
अझहरच्या वैयक्तिक आयुष्याचीही खूप चर्चा झाली आहे. त्याने पहिले लग्न नौरीनशी केले. नौरीन आणि अझहरचा विवाह 1987 मध्ये झाला होता. पण हे नाते फार काळ टिकले नाही. ते दोघे 1996 मध्ये वेगळे झाले. त्यानंतर अझहरने संगीता बिजलानीशी लग्न केले. नौरीनचा नवरा असताना अझहरचे 1994 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानीसोबत अफेअर होते. अझहरने संगीतासोबत लग्न करण्यासाठी पहिली पत्नी नौरीनला घटस्फोट दिला होता. त्यावेळी अझहरला घटस्फोटाची भरपाई म्हणून नौरीनला सुमारे एक कोटी रुपये द्यावे लागले. अझहर आणि संगीता यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. पण हे नातेही तुटले. तब्बल 14 वर्षांच्या लग्नानंतर अझहरने संगीताला घटस्फोट दिला.
अझहरला त्याची पहिली पत्नी नौरीनपासून दोन मुले आहेत. अयाज आणि असद. सप्टेंबर 2011 मध्ये लहान मुलगा अयाजचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. अयाजला बाइक रेसिंगचा शौक होता. हैदराबाद एक्सप्रेस वेवर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. तर दुसरा मुलगा असद क्रिकेटमध्ये करिअर करत आहे. संगीता-अजहर यांना मुले नाहीत.
दमदार कामगिरीने जिंकली चाहत्यांची मने…
अझहर हा त्या काळातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक होता. त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर सर्वांनाच आपलेसे केले होते. अझहरच्या फलंदाजीदरम्यान चेंडू मारण्यासाठी मनगटाचा वापर योग्य पध्दतीनं करत. मनगटाच्या जोरावर सामन्याला कलाटणी देण्याची ताकद त्याच्यात होती. तो लेग साईडला फ्लिक शॉट्स खेळायचा आणि ऑफ साईडला अप्रतिमरित्या कट शॉट्स खेळायचा. त्याला संधी मिळाली तर तो स्लॉग फटकेही मारायचा. यासोबतच तो अनेक प्रकारचे फटके खेळण्यात पटाईत होता.
अर्शीन कुलकर्णी उर्फ ‘ज्यु. हार्दिक पंड्या’ : क्रिकेटमधील एक उगवता तारा…
अझहरने त्याच्या कारकिर्दीत 99 कसोटी सामने खेळले. या कालावधीत 6215 धावा झाल्या. त्याने 22 शतके आणि 21 अर्धशतके केली आहेत. त्याने 334 एकदिवसीय सामन्यांमध्ये 9,378 धावा केल्या. या काळात त्याने 7 शतके आणि 58 अर्धशतके केली.