IND vs ENG : ‘बुमराहवर जास्त अवलंबून राहू नका, कुलदीपला खेळवा!’ माजी भारतीय खेळाडूचा सल्ला

IND vs ENG Mohammad Azharuddin on Jasprit Bumrah : हेडिंग्ले येथील पराभव विसरून भारतीय संघ एजबेस्टन येथे दमदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. काही अहवालांनुसार, वर्कलोडमुळे जसप्रीत बुमराहला दुसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. पहिल्या कसोटीत बुमराह एकमेव गोलंदाज होता, जो चांगल्या लयीत दिसला. जस्सीने पहिल्या डावात कहर करत पाच विकेट्स घेतल्या होत्या. तथापि, भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचे मत आहे की भारतीय संघाने बुमराहवर जास्त अवलंबून राहू नये.
बुमराहवर अति अवलंबित्व योग्य नाही – मोहम्मद अझरुद्दीन
मोहम्मद अझरुद्दीन यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले, “भारतीय संघ बुमराहवर गरजेपेक्षा जास्त अवलंबून आहे. हे सोपे नसते, कारण तुम्हाला आणखी अनुभवी गोलंदाजांची गरज आहे. भारतीय संघाने कुलदीप यादवला प्रत्येक परिस्थितीत खेळवले पाहिजे.” अझरुद्दीन यांचे मत आहे की मनगटी फिरकी गोलंदाजाला संघात समाविष्ट केल्यास भारतीय संघाची गोलंदाजी अधिक संतुलित होईल.
हेडिंग्लेमधील पराभव फलंदाजीमुळे झाला –
Former captain Mohammad Azharuddin said India should play left-arm wrist spinner Kuldeep Yadav in the Edgbaston Test against England to add more experience to their bowling attack and reduce the burden on pace talisman Jasprit Bumrah.#Jaspritbumrah𓃵 #kuldeepyadav #BCCI pic.twitter.com/aOsw36AKCJ
— 𝐆𝐎𝐀𝐓 ⁹³𓃶 (@BUMRAHTHEGOAT93) June 29, 2025
माजी कर्णधाराने पहिल्या कसोटीतील पराभवासाठी भारतीय फलंदाजांना दोषी ठरवले. ते म्हणाले, “हेडिंग्लेमधील पराभव आमच्या अस्थिर फलंदाजीमुळे झाला, पण आता संघाने योग्य खेळाडूंची निवड करायला हवी. आपली गोलंदाजी परिपूर्ण असायला हवी.”
हेही वाचा – Rishabh Pant : कार अपघातातून वाचलेला पंत पुन्हा धोक्यात? डॉक्टरांनी दिला इशारा
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव –
भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध ५ गडी राखून पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. तथापि, इंग्लंड संघाने केवळ ५ गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठले. इंग्लंडकडून बेन डकेटने उत्कृष्ट फलंदाजी करत १४९ धावांची दमदार खेळी केली, तर जो रूट आणि झॅक क्राउली यांनीही अर्धशतके झळकावली. भारतीय गोलंदाजांचे प्रदर्शन दोन्ही डावांत निराशाजनक राहिले.
हेही वाचा – Rohit Sharma : ‘मनात खूप काही चाललं होतं अन् रात्रभर…’, रोहितने सांगितल्या टी-२० विश्वचषक विजयाच्या आठवणी
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ :
शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शरद कुमार, मोहम्मद कुमार, शरदराम, बी. कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव





