Pune: भाजप पदाधिकारी संजय बराटे यांची आत्महत्या
Updated On:

पुणे- वारजे येथील भाजपचे पदाधिकारी संजय ज्ञानोबा बराटे ( 56) यांनी कार्यालयातच गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेमागील नेमके कारण समजलेले नाही.
संजय बराटे हे हवेली तालुक्याचे भाजपचे 1995 मध्ये सरचिटणीस होते. तसेच ते वारजे मारुती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष होते. या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य उभे केले. ट्रस्टच्या राघवदास विद्यालय संस्थेचे ते विद्यमान अध्यक्ष होते. बराटे यांची पत्नी ज्योती यांनी भाजपकडून हवेली पंचायत समितीची निवडणूक लढविली होती. तर बराटे यांनी 2005 मध्ये महापालिकेची अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते सक्रिय राजकारणातून बाहेर पडले.





