नवी दिल्ली – 2014 मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार ( teenage rape case ) केल्या प्रकरणी दोषी आढळलेल्या भाजप आमदार रामदुलार गोंड ( Ramdular Gond ) यांना २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावीणात आली आहे. तसेच न्यायालयाने १० लाखांचा दंडही ठोठावला आहे. ( bjp mla )
उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील दुधी मतदारसंघातील भाजप आमदार रामदुलार गोंड यांना अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. रामदुलार गोंड यांना न्यायालयाने २५ वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाखांचा दंड ठोठावला असून दंडाची रक्कम पीडितेला मिळणार आहे. ( up mla rape case )
या प्रकरणी नोव्हेंबर 2014 मध्ये महापौरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच आठ वर्षांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर हा निकाल देण्यात आला आहे. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे आमदारांच्या वकिलांनी सांगितले आहे.
किशोरवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी रामदुलार गोंड हे दोषी आढळले आहेत. आठ वर्षे चाललेल्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. न्यायाधीश एहसानुल्ला खान यांनी दंडाची संपूर्ण रक्कम पीडितेला देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजप आणि आमदार समर्थकांना मोठा धक्का बसला आहे.