NEET Re Exam : मोठी बातमी.! NEET फेरपरीक्षेसाठी घेतले 2 महत्त्वाचे निर्णय, वाचा…
देशात होणाऱ्या महत्त्वांच्या परीक्षांपैकी एक असणाऱ्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने आणि विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास करून दिलेली परीक्षाच रद्द झाल्याने खळबळ उडाली होती.

NEET Re Exam – देशात होणाऱ्या महत्त्वांच्या परीक्षांपैकी एक असणाऱ्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने आणि विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास करून दिलेली परीक्षाच रद्द झाल्याने खळबळ उडाली होती.
ही परीक्षा रद्द झाल्याची घोषणा होताच देशभरातील 22 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. आता येत्या 21 जून रोजी ही फेरपरीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेसंदर्भात एनटीएने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
ही परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5.15 या वेळेत घेण्यात येणार आहे. याआधी या परीक्षेचा पेपर सोडवण्यासाठी 180 मिनिटांची वेळ देण्यात येत होती. परंतु, आता ही वेळ 15 मिनिटांनी वाढवण्यात आली असून विद्यार्थ्यांना 195 मिनिटांची वेळ पेपर सोडविण्याकरिता मिळणार आहे.
रफ कामांसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये चार पेपर देण्यात येणार आहे. याआधी केवळ दोन पेपर रफ कामांसाठी दिले जात होते. त्यामुळे हे दोन महत्त्वाचे निर्णय एनटीएकडून घेण्यात आले आहेत. ही परीक्षा जून महिन्यात होणार असल्याने पुढील प्रवेशांचे वेळापत्रक कोलमडणार आहे.
नीट – युजी पुनर्परीक्षेच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिका तयार करणारे, नियंत्रक, अनुवादक आणि प्रश्नपत्रिका तयार करण्यामध्ये सहभागी असलेल्या इतर कर्मचाऱ्यांवर कडक नजर ठेवण्यात आली आहे.
त्यांचे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर संपर्क साधने जप्त करण्यात आले आहेत. इंटरनेटचा वापर आणि बाहेरील लोकांशी संपर्क साधण्यासही सक्त मनाई आहे.
तसेच, अधिकाऱ्यांनी सांगितले की या सुरक्षित परिसरातील प्रवेश आणि बाहेर पडण्यावर कडक नजर ठेवली जात आहे आणि त्यांच्या प्रत्येक हालचालींचीही नोंद ठेवली जाते.
केवळ अधिकृत कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जात असून स्मार्टवॉचसह सर्व डिजिटल उपकरणे परिसराबाहेर ठेवण्यात येत आहेत. डिजिटल क्षेत्रात अधिकारी 24 तास सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मेसेजिंगवर लक्ष ठेवून आहेत, जेणेकरून बनावट प्रश्नपत्रिका, चुकीची माहिती आणि संशयास्पद गतिविधींना परीक्षेपासून दूर ठेवता येईल.






