अहमदनगर – अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकासह सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार, चार जणांना निलंबित करण्यात आले असून दोघांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुनील पोखरणा, वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुरेश ढाकणे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. विशाखा शिंदे, स्टाफ नर्स सपना पठारे यांना निलंबीत करण्यात आले आहे. तर स्टाफ नर्स आस्मा शेख, स्टाफ नर्स चन्ना आनंत यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
1. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा – निलंबित
2. डॉ.सुरेश ढाकणे- वैद्यकीय अधिकारी- निलंबित
3. डॉ. विशाखा शिंदे – वैद्यकीय अधिकारी- निलंबित
4. सपना पठारे- स्टाफ नर्स- निलंबित
5. आस्मा शेख -स्टाफ नर्स – सेवा समाप्त
6. चन्ना आनंत – स्टाफ नर्स- सेवा समाप्त
2/2— Rajesh Tope (@rajeshtope11) November 8, 2021
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले होते. तसेच अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
– दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांची नावे
सिताराम दगडु जाधव (वय 83, बख्तपुर ता. शेवगाव), भिवाजी सदाशिव पवार (80, किन्ही ता. पारनेर), रामकिसन विठ्ठल हरपुडे (70, माका, ता. नेवासा), कोंडाबाई मधुकर कदम (70, केडगाव, ता. नगर), छबाबी अहमद सय्यद (65, शेंडी, रा. नगर), सत्यभामा शिवाजी घोडचौरे (65, तेलकुडगाव, ता. नेवासा), कडुबाळ गंगाधर खाटीक (65, पाथरवाला, ता. नेवासा), आसराबाई गोविंद नागरे (58, शेवगाव, ता. शेवगाव), दिपक विश्वनाथ (37, आश्वी, ता. संगमनेर) आणि एक 58 वर्षीय अनोळखी व्यक्ती यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.